
जेमतेम ४५ वर्षे वय असलेले गोपाल अग्रवाल यांचा आज वाढदिवस होता काम आटपून घरी लवकर जाऊन परिवारासोबत वेळ घालवावा या हेतूने आपले काम आटपून घराकडे निघाले.
अकोला: जेमतेम ४५ वर्षे वय असलेले गोपाल अग्रवाल यांचा आज वाढदिवस होता काम आटपून घरी लवकर जाऊन परिवारासोबत वेळ घालवावा या हेतूने आपले काम आटपून घराकडे निघाले.
मात्र अचानक अज्ञात मारेकर्यांरी येतात अन त्यांच्यावर गोळ्या झाडतात. वाढदिवसाच्या दिवशीच ही हत्या झाल्याने जणू अग्रवाल परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला
हेही वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार
मनमिळावू आनंदी सगळ्यान सोबत आनंदाने वावरणाऱ्या गोपाल अग्रवाल याची गोळ्या झाडून हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अशी घडली घटना -
एमआयडीसी पोलीस स्टेशन अकोला हद्दीत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील बाभूळगाव जहॉंगीर जवळ सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडलेल्या एका घटनेमध्ये खोलेश्वर अकोला येथील गोपाल हनुमान प्रसाद अग्रवाल यांच्यावर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी पाठलाग करीत त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या यामध्ये त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना घडली असून दोन्ही आरोपी रोकड घेऊन फरार झाल्याचे वृत्त आहे
हेही वाचा - तरूणाचे मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र, आत्महत्येची परवानगी द्या अन्यथा नक्षलवादी बनून तुमच्यासमोर येईल
नियतीने साधला डाव
दुचाकी वरुन गेल्याने घात झाला. नेहमी रोकड घेऊन चारचाकी गाडीने जात असलेल्या गोकूळ हनुमान प्रसाद अग्रवाल आज दुचाकीने निघाल्याने नियतीने डाव साधीत घात केल्याची चर्चा आहे.
(संपादन - विवेक मेतकर)