
शैक्षणिक कर्ज देउ शकत नसाल, तर निदान आत्महत्या करायची परवानगी द्या अन् तेही करत नसाल, तर नक्षली बनून येईल....!’ असं पत्रं लिहून बुलडाणा जिल्हयातील आदिवासी भागांतील फार्मसिच्या वैभव बाबाराव मानखैर या विद्यार्थ्याने चक्क मुख्यमंत्र्याना आत्महत्येची परवानगी मागितली आहे.
बुलडाणा : घरची परिस्थिती जेमतेम अन् त्यातही वैभवमध्ये शिकण्याची मोठी जिद्द. शिक्षणासाठी त्याने बॅंकेकडे शैक्षणिक कर्ज मागितले. पण, वडिलांनी बॅंकेचे पिक कर्ज फेडले नसल्यामुळे त्याला कर्ज नाकारले.
यासर्व प्रकरणातून हताश झालेल्या वैभवने चक्क मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्येची परवानगी मागितली आहे. परवानगी दिली नाही, तर नक्षलवादी बनून तुमच्यासमोर येईल, अशा गंभिर इशारा सुध्दा त्याने दिला आहे. वैभवने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार
शैक्षणिक कर्ज देउ शकत नसाल, तर निदान आत्महत्या करायची परवानगी द्या अन् तेही करत नसाल, तर नक्षली बनून येईल....!’ असं पत्रं लिहून बुलडाणा जिल्हयातील आदिवासी भागांतील फार्मसिच्या वैभव बाबाराव मानखैर या विद्यार्थ्याने चक्क मुख्यमंत्र्याना आत्महत्येची परवानगी मागितली आहे.
यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
नक्षली बनन्याच्या त्याच्या धमकीने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यामुळे आर्थिक परिस्थितिने हतबल झालेल्या विद्यार्थ्यांची व्यथा पुन्हा ऐरणीवर आली आहे. वैभवच्या या स्थितीमुळे यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
करिअरच्या मार्गात शिक्षण आणि व्यवस्थाही
बुलडाणा जिल्ह्यातिल आदिवासीबहुल संग्रामपूर तालुक्यातील काकोडा गावात राहणारे बाबाराव मानखैर आपल्या मुलांना शिकविण्यासाठी धडपड करतात. पण त्यांना निसर्गाने साथ दिली नाही. चांगल पिक झालं नाही. म्हणून त्यांनी पिक कर्ज फेडल नाही. त्यांच्या घरी फक्त सव्वा दोन एकर शेती आहे. दोन मूल आणि परिवाराचा चरितार्थ चालेल बस इतकच पिक या शेतात पिकत. त्यातही निसर्गाच्या लहरीपणामुळे कर्ज फेडू शकले नाही. त्यामुळे आता मुलाच्या शिक्षणात अडथळा आला.
हेही वाचा - कोरोनाची धास्ती, उडाली झोप, इंग्लंडवरून अकोल्यात पोहोचलेल्या आठ प्रवाशांमुळे वाढली डोकेदुखी
फार्मसी शिकणाऱ्या हुशार मुलावर आली शिक्षण थांबविण्याची वेळ
बाबाराव यांचा मोठा मुलगा प्रसाद शेतीत वडिलांना मदत करतो. तर वैभव हा बारावीनंतर धुळे जिल्ह्यातिल बोराडी येथील फार्मसी कॉलेजात बी. फार्मसी च्या दुसऱ्या वर्षात शिकतो आहे. बारावीनंतर जवळ असलेल्या पैशांतून बाबारावांनी वैभवला फार्मसी महाविद्यालयात पाठवले. पहिल्या वर्षी वैभवला चांगले गुण मिळाले. वैभव दुसऱ्या वर्षात गेला. पण यावर्षी शेतात काही पिकलच नाही म्हणून जवळ पैसा नसल्याने दुसऱ्या वर्षाच शिक्षण थांबण्याची वेळ आली. म्हणून वैभवने संग्रामपूर येथील बैंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत शैक्षणिक कर्जासाठी चार महिन्यापूर्वी मोठ्या अर्ज केला. चार महिन्यांत अनेखदा बैंकेचे खेटे घेतले.
बॅंकेने नाकारले
बॅंकेकडून प्रतिसाद न मिळाल्याने वैभव हतबल झाला. आज नाही तर उद्या आपल शैक्षणिक कर्ज मंजूर होऊन आपण परत कोलेजला जाऊ, या आशेवर तो वाट बघत होता. पण तुमच्या वडिलांनी घेतलेल पिक कर्ज न भरल्याने तुम्हाला शैक्षणिक कर्ज देउ शकत नाही, असे कारण बॅंकेने सांगितले आणि वैभवला रिजेक्शन लेटर दिले. पुढील शिक्षणाच स्वप्न भंग झाल्याने त्याने आता थेट मुख्यमंत्र्याना पत्र पाठवून आत्महत्येची परवानगी मागितली आहे. येवढेच नाही तर परवानगी दिली नाही, तर मोठ्ठा नक्षलवादी बनन्याची धमकीही त्याने पत्रात दिली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
का आली ही वेळ?
बॅंकेच्या अधिकाऱ्याशी संपर्क केला असता ते ‘नॉट रिचेबल’ होते. मात्र अमरावती येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क झाला. ते म्हणाले, शाखा कर्ज देऊ शकत नव्हती, तर तेव्हाच तत्काळ त्यांना सांगायला पाहिजे होते. चार महिन्यांनी ‘कर्ज मिळणार नाही’, असे म्हणणे चुकीचे आहे. झाल्या प्रकाराची चौकशी करू. कर्ज नामंजूर झाले हे सांगण्यासाठी बॅंकेला चार महीने का लागले? यात विद्यार्थ्याचा वेळ वाया गेला. य कालावधीत तो दुसऱ्या बॅंकेकडे कर्ज मागु शकला असता. जर बैंकेला हा विद्यार्थी होतकरु दिसला नसेल, तर मग त्याने फार्मसिच्या पहिल्या वर्षात चांगले मार्क्स कसे मिळवले? वैभवच्या वडिलांनी पिक कर्ज जरी भरल नाही, तरी हा विद्यार्थी शिक्षण घेतल्यावर ते फेडू शकला असता? असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. टोकाची भूमिका घेतलेल्या वैभवच्या पत्रावर मुख्यमंत्री काय उत्तर देतात, हे सुध्दा पाहणे महत्वाचे आहे.
(संपादन - विवेक मेतकर)