Akola: पीक विम्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crop loan

अकोला : पीक विम्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

अकोला : अकोट व तेल्हारा तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व ५२ मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्यात यावा, या मागणीसह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात शुक्रवारी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात ठीय्या आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व ५२ मंडळात पीक विमा लागू करून तो सरसकट पद्धतीने देण्यात यावा. पीक विम्याचे पैसे टप्प्याने न देता एक रकमी देण्यात यावे. ऑनलाइन सर्वे झालेला विमा लवकर मंजूर करावा. मंजूर झालेल्या विम्याचे पैसे लवकरात लवकर द्यावे. अकोट तालुक्यात विमा कंपनीच्या प्रतिनिधिंनी सर्वे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचे आरोप आहेत. त्याची चौकशी होऊन कारवाई व्हावी अशा मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात रिंग रोडवरील पीक विमा कंपनीच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

या आंदोलनानंतर पीक विमा प्रतिनिधींनी या सर्व मागण्यांचा लवकरात लवकर विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आंदोलनात सचिन बोनगिरे, किरण ठाकरे, गणेश महल्ले, गणेश कुकडे, अमोल क्षिरसागर, हर्षल ठाकरे, श्रीकांत साबळे, गौरव गावंडे, कैलास अवताडे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

loading image
go to top