अकोला : ‘दामिनी’ देणार वीज पडण्याची सूचना!

दामिनी ॲपचा वापर करून वीजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन
Akola Damini mobile app indicate will give notice of spell
Akola Damini mobile app indicate will give notice of spellsakal

अकोला : प्रादेशिक हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार पूर्वमान्सून व मान्सून कालावधित वीज पडून जिवीतहानी होत असते. वीज पडून जिवित हानी होऊ नये, या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांनी “दामिनी” ॲप तयार केले आहे. हे दामिनी ॲप वीज पडण्याची सूचना देणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी ॲपचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

दामिनी ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना तसेच शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी ,कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना दामिनी ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करावे. या ॲपचे जीपीएस लोकेशनने काम करीत असून, विज पडण्याच्या १५ मिनिटापूर्वी ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. ॲपमध्ये आपले सभोवताल वीज पडत असल्यास ठिकाणापासुन सुरक्षीत स्थळी जावे. तसेच त्यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये.

वेळेत देता येईल इशारा

गावातील सर्व स्थानिक, शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी दामिनी ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या अलर्टनुसार आवश्यक पूर्वसूचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी जीवितहानी टाळावी, असे आवाहन प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com