esakal | देवेंद्र फडणविसांच्या हस्ते ऑनलाइन उद्‍घाटन ठरले आभास!, जिल्हा स्त्री सामान्य रूग्णालयाची हेळसांड 
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Devendra Fadnavis inaugurates online illusion !, District Women's General Hospital care

दहा वर्षापूर्वी वाशीम येथे मंजूर झालेल्या जिल्हा स्त्री सामान्य रूग्णालयाची ईमारत चार वर्षापासून तयार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी एका वर्षापूर्वी या ईमारतीचे ऑनलाइन लोकार्पण केले होते. मात्र शंभर खाटांचे हे जिल्हा सामान्य स्त्री रूग्णालय अजूनही सुरू झाले नाही. आरोग्य प्रशासनाने आता रूग्णालयाचा वापर कोविड उपचार केन्द्र म्हणून सुरू केला असून, जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

देवेंद्र फडणविसांच्या हस्ते ऑनलाइन उद्‍घाटन ठरले आभास!, जिल्हा स्त्री सामान्य रूग्णालयाची हेळसांड 

sakal_logo
By
राम चौधरी

वाशीम ः दहा वर्षापूर्वी वाशीम येथे मंजूर झालेल्या जिल्हा स्त्री सामान्य रूग्णालयाची ईमारत चार वर्षापासून तयार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी एका वर्षापूर्वी या ईमारतीचे ऑनलाइन लोकार्पण केले होते. मात्र शंभर खाटांचे हे जिल्हा सामान्य स्त्री रूग्णालय अजूनही सुरू झाले नाही. आरोग्य प्रशासनाने आता रूग्णालयाचा वापर कोविड उपचार केन्द्र म्हणून सुरू केला असून, जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.


पंधरा वर्षापूर्वी तत्कालीन महिला व बालकल्याण मंत्री सुभाष झनक यांनी वाशीम जिल्ह्यासाठी शंभर खाटांचे जिल्हा स्त्री रूग्णांलय मंजूर केले होते. सन २००९ मध्ये या रूग्णालयाला प्रशासकिय मंजूरात मिळाली होती. वाशीमपासून चिखली सुर्वे या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सन २०१२ मध्ये या रूग्णालयाचे बांधकाम सुरू झाले होते. तीन वर्षापूर्वीच या रूग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. २१ कोटी रूपये खर्च करून ही इमारत उभी राहिल्यानंतर श्रेयवादाच्या राजकिय चढाओढीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी या रूग्णालयाचे ऑनलाइन लोकार्पण केल्याची घोषणा केली होती.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी ्क्लिक करा

ऑनलाइन लोकार्पण ही संकल्पना जिल्हास्तरीय सामान्य रूग्णालयासाठी मात्र केवळ आभास ठरली आहे. शहरापासून दोन किलो मीटर अंतरावर असलेल्या या रूग्णालयाच्या आवारात आता केवळ रानटी वनस्पती वाढल्या आहेत. गेल्या दोन महिण्यापासून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने या रूग्णालयाचा वापर कोेरोना रूग्णांवर उपचार करणारे केंद्र म्हणून सुरू केला आहे.

सध्या येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाचा परिसर व ईमारत कमी पडत आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये महिलांसाठी मोजक्याच खाटा आहेत. या पार्श्वभूमिवर स्वतंत्र रूग्णालय तयार असताना ऑनलाइन उद्‍घाटन करणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही याकडे पुन्हा ढुंकून पाहिले नसल्याने ही वास्तू पडीक पडते की काय? अशी भिती निर्माण झाली आहे.

जिल्हा स्त्री सामान्य रूग्णालयाची ईमारत पूर्ण झाली आहे. मात्र आतील काही काम अजूनही अपूर्ण आहे. त्या कामासाठी निधींची कमतरता आहे. सध्या या रूग्णालयामध्ये कोविड केअर सेंटर चालविले जाते.
- अंबादास सोनटक्के, जिल्हा शल्य चिकीत्सक, वाशीम

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
तत्कालीन महिला व बालविकास मंत्री सुभाष झनक यांच्या कार्यकाळात या रूग्णालयाला मान्यता मिळाली आहे. रूग्णालयातील मनुष्य बळासाठी शासनाने एका वर्षापूर्वी अधिसूचनाही काढली होती. सध्या या रूग्णालयासाठी नेमलेल्या दोन वैद्यकिय अधिकारी व परिचारीका जिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. अंतर्गत कामासाठी निधी कमी पडत असेल तर तो निधी उपलब्ध करून देण्याची जवाबदारीही लोकप्रतिनिधींचीच आहे.

(संपादन - विवेक मेतकर)