यंदा काठ्या नाही मिळाल्या; पोलीसांच्या काठ्यांनी मात्र बसवली जरब!

प्रा.अविनाश बेलाडकर 
Saturday, 25 July 2020

प्रचंड प्रमाणात होणारी काठ्यांची विक्री यंदाच्या नागपंचमीच्या पर्वावर कवठ्या(सोपीनाथ)त झालीच नाही, उलटपक्षी पोलीसांच्या काठ्यांनी जरब बसविल्यामुळे कुलूपबांबंद सोपीनाथ मंदीराकडे भाविक आज फिरकलेच नाहीत.

मूर्तिजापूर (जि.अकोला) : प्रचंड प्रमाणात होणारी काठ्यांची विक्री यंदाच्या नागपंचमीच्या पर्वावर कवठ्या(सोपीनाथ)त झालीच नाही, उलटपक्षी पोलीसांच्या काठ्यांनी जरब बसविल्यामुळे कुलूपबांबंद सोपीनाथ मंदीराकडे भाविक आज फिरकलेच नाहीत.

कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या भितीमुळे मूर्तिजापूर तालुक्यातील कवठा (सोपीनाथ) या गावातील एरव्ही नागपंचमीला लाखभर भक्तांनी फुलून जाणारे सोपीनाथ महाराज मंदीर आज कुलूपबंद राहिले. नागपंचमी आणि पोळ्याच्या पाडव्याच्या पर्वावर होणार नसल्यामुळे भाविक हिरमुसले आहेत.  

कवठा सोपीनाथ या गावात सोपीनाथ महाराजांचे पुरातन मंदीर आहे. अनेक वर्षां पासून येथे नागपंचमी व पोळा (दुसरा दिवस) या सणांच्या पर्वावर यात्रा भरते. याप्रसंगी येथील काठी घेऊन जाण्याची परंपरा आहे. या यात्रेत दर्शनासाठी  पंचक्रोशीतील ८० ते ९० हजारावर भाविक हजेरी लावतात. काठ्यांची खरेदी करतात.  

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे. ग्रामीण भागात त्याचा शिरकाव झालेला आहे. यात्रेच्या निमित्याने लाखावर एकत्रीत येण्या भाविकांमुळे कोरोना समुह संसर्गाचा धोका बळावण्याची शक्यता विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कवठ्याचे ग्रामसेवक व तलाठी यांनी केलेल्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर सोपीनाथ महाराजांचे मंदीर दर्श नासाठी बंद  ठेवण्यात आले. आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून यंदा नागपंचमी व पोळा (दुसरा दिवस) या दो न्ही दिवशी म्हणजे २४ ते २६ सप्टेंबर जुलै व १७ ते २० अॉगस्ट हे ७ दिवस प्रतिबंधात्मक आदेश लागू रहाणार आहेत.

प्रशासनाने मंदीर प्रवेश, यात्रा, मिरवणूक, कार्यक्रमास मनाई केल्याने भाविकांनी 'दूरदर्शन' घेतले. गावाच्या सीमा बंद ठेवण्यात आल्यामुळे  कोणीही गावात किंवा मंदीरात  दर्शनासाठी जाऊ शकले नाही.. जिल्ह्यात सध्या १४४ कलम लागू आहे. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी  भाविकांनी आपापल्या घरीच थांबून देवाचे स्मरण केले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola did not get sticks this year; However, the police batons did not fit!