Akola: जिल्ह्यातील ९३ वी गुन्हेगार टोळी हद्दपार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोळी हद्दपार

अकोला : जिल्ह्यातील ९३ वी गुन्हेगार टोळी हद्दपार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढता आलेख लक्षात घेवून पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्ह्यातील आणखी दोन गुन्हेगारांना दोन वर्षांकरिता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. हद्दपार करण्यात आलेली ही जिल्ह्यातील ९३ वी टोळी आहे. त्यात संघटीत गुन्हेगारी करणाऱ्या २३० गुन्हेगारांचा समावेश आहे. याशिवाय ३६ गुन्हेगारांवरही हद्दपारीची कारवाई केली आहे.

सण-निवडणुकीचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून शांतता रहावी याकरिता अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांवर कारवाई केली जात आहे. त्याअनुशंगाने अकोट फैल पोलिस स्टेशनच्या हद्दीत टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार अकोट फैल परिसरातील लाडीस फैल भागात राहणारे महेश ओंकार त्रिपाठी (२५) व रवी उर्फ रविशंकर ओंकार त्रिपाठी (३६) या दोघांना दोन वर्षाकरिता कलम ५५ महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये अकोला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी ता. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी दोघांनाही जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याचा आदेश दिला. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अकोला जिल्हा पोलिस दलाचा पदभार स्वीकारल्यापासून आजपावेतो एकूण ४५ ईसमांविरुध्द एमपीडीए ॲक्ट अन्वये कारवाई केली. याशिवाय महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५ अन्वये एकूण ९३ गुन्हेगारी टोळ्यांतील एकूण २३० इसमांना तसेच कलम ५६ महाराष्ट्र पोलिस अधिनियम अन्वये ३६ इसम असे एकूण २६६ इसमांना आजपर्यंत अकोला जिह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

loading image
go to top