Akola Domestic Gas Misuse: व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा सर्रास वापर? शासनाचे आदेश कागदावरच

Government Orders Regular Inspection of Commercial Gas Use: अकोला शहर व जिल्ह्यात मंगल कार्यालये, लॉन, हॉल आणि कॅटरिंगसारख्या व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचा ग्राहक संघटनांचा आरोप आहे.
Akola Domestic Gas Misuse

Akola Domestic Gas Misuse

esakal

Updated on

अकोला: मंगल कार्यालये, लॉन, हॉल तसेच कॅटरिंग सेवांच्या ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होऊ नये, यासाठी शासनाने स्पष्ट निर्देश दिले असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप ग्राहक संघटनांकडून करण्यात येत आहे. व्यावसायिक ठिकाणी केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरच वापरणे बंधनकारक असताना शहर व जिल्ह्यात या नियमाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com