
अकोला : डीपीसीच्या निवडणुकीसाठी २८ उमेदवारांचे अर्ज; सर्व वैध
अकोला : जिल्हा परिषदेतून जिल्हा नियोजन समितीवर निवडणून द्यायच्या १४ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निडवणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४ ऑगस्ट रोजी २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. संबंधित सर्व अर्जांची शुक्रवारी छाननी करण्यात आली. छाननीमध्ये सर्वच २८ अर्ज वैध ठरले. त्यामुळे सोमवारी नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर १८ ऑगस्टचे दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवार माघार घेवू शकतील. त्यामुळे १८ ऑगस्ट रोजीच निवडणुकीची चित्र स्पष्ट होईल.
मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेतून डीपीसीवर निवडून जाणाऱ्या १४ जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या निवडीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राजकीय घडामोळींना वेग आला असून डीपीसीवर निवडून जाण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी १ ते ४ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले.
त्यानुसार बुधवारी शिवसेना, कॉंग्रेस, अपक्ष, प्रहार व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तर गुरुवारी वंचितसह भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे आता एकूण अर्ज करणाऱ्यांची संख्या २८ झाली आहे. संबंधितांच्या अर्जांची ५ ऑगस्ट रोजी छाननी करण्यात आली. सदर छाननीमध्ये सर्वच अर्ज वैध ठरले.
उमेदवारी दाखल करणाऱ्यांची संख्या
प्रवर्ग संख्या
सर्वसाधारण १०
सर्वसाधारण स्त्री ०८
अनुसूचित जमाती ०२
अनुसूचित जाती ०३
अनुसूचित जाती स्री ०५
Web Title: Akola Dpc Election Candidates Applications Valid
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..