अकाेला : नॅशनल हायवेवर साचली गटारगंगा

संबंधित विभागास नाली बांधकामाचा विसर
Akola drainage water on Malegaon Shirpur Risod National Highway
Akola drainage water on Malegaon Shirpur Risod National Highwaysakal

शिरपूर : एम एच ४६१ बी या मालेगाव शिरपूरमार्गे रिसोडकडे जाणाऱ्या नॅशनल हायवेवर रिसोड फाट्यानजीक संबंधित विभागाने नाली बांधकाम न केल्याने ऐन वळणाच्या रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे रहदारीस व वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.

या नॅशनल हायवेचे अंदाजे वर्षभरापूर्वी काम पूर्णत्वास गेले आहे. रस्त्याच्या दुतर्फा पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी नाली बांधकाम करणे आवश्यक असतानासुद्धा व अंदाजपत्रकामध्ये सदर काम समाविष्ट असतानासुद्धा, एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी नाली बांधकाम केले नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याच्या नियोजनाअभावी पाणी स्थानिक रिसोड फाटानजीक स्थानिक रहिवासी गुलाम भाई यांच्या घरासमोर साचत आहे. त्यामुळे रहदारीस व वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला असून अपघातास निमंत्रण मिळत आहे. लोकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरत असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांनी संबंधित यंत्रणेकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. सदर काम अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट असताना व शासनाचा निधी मंजूर असताना नाली बांधकाम करण्याचे का टाळण्यात आले? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

संबंधित यंत्रणेने व स्थानिक प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा व गावालगत त्वरित नाली बांधकाम करण्यात यावे, जेणेकरून पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लागेल व नागरिकांना त्रास होणार नाही. अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने होत आहे.

नॅशनल हायवेचे काम संपून एक वर्षाचा कालावधी झाला आहे. मात्र अद्यापही संबंधित यंत्रणेने पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नालीचे बांधकाम केले नाही. त्यामुळे वळणाच्या रस्त्यावर तुडुंब पाणी साचत आहे. स्थानिक प्रशासनाने याची दखल घ्यावी व नागरिकांना दिलासा द्यावा .

- सैय्यद गुलाम, स्थानिक रहिवासी, शिरपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com