water issue in akola
sakal
अकोला - जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता आता शेतशिवारापुरती मर्यादित न राहता थेट ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर आली आहे. पावसाळा संपण्यापूर्वीच अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील सुमारे ३५० गावांवर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. अनेक गावांमध्ये महिनाभरातून एकदा नळाला पाणी येत असल्याने मिळेल ते पाणी घरांसमोरील आणि गच्चीवरील टाक्यांमध्ये साठवून महिनाभर वापरण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.