रोजगाराचे संकट गडद;  80 हजारांपर्यंत पोहचले नोंदणीकृत बेरोजगार 

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 6 July 2020

कोरोना महामारीने अर्थव्यवस्थेला जबर फटका बसल्याने बेरोजगारीचे प्रमाण विक्रमी पातळीवर पोहचले आहे. शासकीय भरती प्रक्रिया रखडली आहे. उद्योगांचे नुकसान झाल्यामुळे खाजगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. परिणामी शहरांमधील प्रत्येक पाचवा व्यक्ती बेरोजगार असल्याचे निरीक्षण नुकतेच एका राष्ट्रीय संस्थेने नोंदविले आहे. बेरोजगारीच्या या आगेत जिल्ह्यातील तरुण सुद्धा होरपडल्या जात आहे. रोजगार उपलब्ध नसल्याने वर्षभरात जिल्ह्यातील नोंदणीकृत बेरोजगारांची संख्या सुद्धा 80 हजारांपर्यंत जाऊन पोहचली आहे, तर बिगर नोंदणीकृत बेरोजगारांची संख्या लाखावर असल्याचे वास्तव आहे. 

अकोला  ः कोरोना महामारीने अर्थव्यवस्थेला जबर फटका बसल्याने बेरोजगारीचे प्रमाण विक्रमी पातळीवर पोहचले आहे. शासकीय भरती प्रक्रिया रखडली आहे. उद्योगांचे नुकसान झाल्यामुळे खाजगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. परिणामी शहरांमधील प्रत्येक पाचवा व्यक्ती बेरोजगार असल्याचे निरीक्षण नुकतेच एका राष्ट्रीय संस्थेने नोंदविले आहे. बेरोजगारीच्या या आगेत जिल्ह्यातील तरुण सुद्धा होरपडल्या जात आहे. रोजगार उपलब्ध नसल्याने वर्षभरात जिल्ह्यातील नोंदणीकृत बेरोजगारांची संख्या सुद्धा 80 हजारांपर्यंत जाऊन पोहचली आहे, तर बिगर नोंदणीकृत बेरोजगारांची संख्या लाखावर असल्याचे वास्तव आहे. 

 

कोरोनामुळे भारतासह जगात आर्थिक महामंदीची लाट उसळली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात मोठी मंदी कोरोना महामारीमुळे आल्याने अनेकांवर बेरोजगारीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोठेही रोजगाराची संधी उपलब्ध नसल्याने बेरोजगार सैरभैर झाला आहे. उद्योग, कारखाने धडाधडा बंद होत आहेत अथवा त्यामध्ये कर्मचारी कपात करण्यात येत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

लहान उद्योगांचे सुगीचे दिवस संपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असल्यानंतर सुद्धा विद्यापीठातून मात्र मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बाहेर पडत आहेत. त्यांची मिळेत ते काम करण्याची इच्छा आणि पात्रताही आहे. परंतु कामच उपलब्ध नाही. त्यामुळे तरुण निराश होत आहेत. तरुणांना दिलासा देण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न केले जातील, ही सर्वांना आशा आहे. किमान निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणांवर शासन अंमलबजावणी करेल आणि शासकीय कार्यालयांसह खाजगी कंपन्यामध्ये तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी आस सुशिक्षित तरुण लावून बसले आहेत. 

बेरोजगारांची महास्वंयम्‌कडे धाव 
रोजगार मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण शासनाच्या महास्वयंम संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगारासाठी नोंदणी करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नोंदणीकृत बेरोजगारांची संख्या 79 हजारांवर जावून पोहचली आहे. याव्यतिरीक्त अनोंदणीकृत बेरोजगारांची संख्या लाखावर आहे. नोंदणीकृत व अनोंदणीकृत असे लाखो सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. 

असे आहेत नोंदणीकृत बेरोजगार 
शिक्षण              संख्या 
दहावी अनुत्तीर्ण 15857 
एसएससी 25448 
एचएससी 27558 
डिप्लोमा होल्डर 4614 
आयटीआय 4043 
अप्रेन्सिस झालेले 842 
स्नातक 14087 
स्नातकोत्तर 2208 
एकूण 78798 

रोजगार मेळावे, महास्वंयम्‌ संकेतस्थळ, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम आदी माध्यमातून बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तरुणांनी महास्वंयम्‌कडे धाव घेतल्याने जून महिन्यात गत तीन महिन्याच्या तुलनेत सर्वाधिक रोजगासाठी नोंदणी केली आहे. 
- सुधाकर आर. झडके, कौशल्य विकास रोजगार  व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, अकोला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Employment crisis dark; Reached 80 thousand registered unemployed