

Akola Farmer DBT Subsidy
esakaol
अकोला : जिल्ह्यातील तब्बल ८० हजार ५३५ एपीएल केशरी रेशनकार्डधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेतून मिळणारे अनुदान गेल्या पाच महिन्यांपासून रखडले आहे. मार्च २०२६ पर्यंत जिल्ह्यातील लाभार्थींना २ कोटी ३३ लाख १३ हजार ५३५ रुपयांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर निधी उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. पुढील टप्प्यासाठी शासनाकडे सुमारे १० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.
दुष्काळाच्या काळात राज्यातील १४ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना तीन रुपये किलो दराने तांदूळ आणि दोन रुपये किलो दराने गहू, असा प्रतिमहिना जास्तीत जास्त २५ किलो धान्याचा लाभ दिला जात होता. शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा मिळावी आणि आर्थिक संकटात दिलासा मिळावा, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती.
त्यानंतर धान्याऐवजी प्रतिलाभार्थी प्रतिमाह १७० रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याची डीबीटी योजना लागू करण्यात आली. त्यामुळे एपीएल शेतकरी कार्डधारकांना या रकमेचा आधार मिळत आहे. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून निधीअभावी ही रक्कम खात्यात जमा झालेली नाही.
यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडून मिळणारे १७० रुपयांचे मासिक अनुदानही वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. रखडलेली रक्कम तातडीने वितरित करण्याची मागणी होत आहे.
अकोला ६,६४१
अकोला शहर ४,४५९
अकोट ३१,४४९
बाळापूर ३,५५५
बार्शीटाकळी ५११
मूर्तिजापूर १२,९१९
पातूर ३,३०८
तेल्हारा १७,६९३
जिल्ह्यातील ८० हजार ५३५ लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. यामध्ये अकोट तालुक्यात सर्वाधिक ३१ हजार ४४९ लाभार्थी असून, एकूण लाभार्थ्यांपैकी सुमारे ३९ टक्के लाभार्थी या तालुक्यात आहेत. त्याखालोखाल तेल्हारा तालुक्यात १७ हजार ६९३ (सुमारे २२ टक्के), तर मूर्तिजापूरमध्ये १२ हजार ९१९ (सुमारे १६ टक्के) लाभार्थी आहेत. या तीन तालुक्यांतील लाभार्थ्यांची संख्या मिळून ६२ हजार ६१, म्हणजेच जिल्ह्यातील एकूण लाभार्थ्यांपैकी सुमारे ७७ टक्के आहे. अकोला तालुक्यात ६ हजार ६४१, अकोला शहरात ४ हजार ४५९, बाळापूरमध्ये ३ हजार ५५५, पातूरमध्ये ३ हजार ३०८ आणि बार्शीटाकळीत ५११ लाभार्थी आहेत. त्यामुळे अकोट, तेल्हारा आणि मूर्तिजापूर या तीन तालुक्यांवर या योजनेच्या निधीचा मोठा वाटा राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.