Akola Farmer Death: महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू? शेतात पिकांना पाणी देताना बसला होता विजेचा धक्का

शेतातील स्प्रिंकलर पाईपद्वारे हरभरा पिकाला पाणी देताना विद्युत ताराला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रिधोरा शेतशिवारात आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे.
Akola Farmer Death: महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू? शेतात पिकांना पाणी देताना बसला होता विजेचा धक्का

Balapur Akola Farmer Died Due to Shock : शेतातील स्प्रिंकलर पाईपद्वारे हरभरा पिकाला पाणी देताना विद्युत ताराला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रिधोरा शेतशिवारात आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. गोविंदा देवराव कवळकार (वय ३४)असे या शेतकऱ्याचे नाव असून या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.


मृतक गोविंदा कवळकार या शेतकऱ्याची रिधोरा शेतशिवारात शेती आहे. आज सोमवारी सर्व कुटुंबीय शेतात गेले होते. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. मृतक गोविंदा देखील हरभरा पिकाला पाणी देत होता. पाईप बदलण्यासाठी गोविंदाने पाईप हाती घेतला असता त्या पाईपाचा स्पर्श शेतात लोंबकळत असलेल्या विज तारांना झाला. स्पर्श होताच हा तरुण शेतकरी खाली कोसळला.

हा सर्व घटनाक्रम कुटुंबीयांनी बघीतल्या नंतर आरडाओरडा केला. गोविंदाला तातडीने सर्वोपचार मध्ये दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या शेतकऱ्या मागे दोन मुले, पत्नी आहे. उद्या मंगळवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्याच्या मृत्यूला महावितरण जबाबदार असल्याचा आरोप
शेतात लोंबकळत असलेल्या विजेच्या जिवंत तारांना स्पर्श झाल्याने ३४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी या घटनेस महावितरणला जबाबदार ठरविले. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे तरुणाचा जीव गेल्याचा आरोप नागरिकांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. (Latest Marathi News)

शेतात डाबकी सबस्टेशन येथून विज पुरवठा केला जातो. अनेक दिवसांपासून विजेच्या तारा शेतात लोंबकळत आहेत. याची तक्रार देखील महावितरणकडे देण्यात आली होती. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. घटनेची माहिती बाळापूर पोलिसांना देण्यात आली.

Akola Farmer Death: महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू? शेतात पिकांना पाणी देताना बसला होता विजेचा धक्का
Balasaheb Thackeray: रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अन् बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन; PM मोदींनी दिल्या सदिच्छा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com