Akola: पंचवीस वर्षांत सव्वा तीन हजार शेतकऱ्यांनी दिला जीव! मायबाप सरकार लक्ष देईल काय; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांचा टाहो
Akola Farmer: अकोला जिल्ह्यात मागील २५ वर्षांत ३,२७७ शेतकऱ्यांनी दिला जीव!; कर्जबाजारीपणा, सिंचनाचा अभाव व सरकारी योजना अपयशी ठरल्या. सरकार आमच्याकडे लक्ष देईल काय असा सवालही शेतकरी कुटूंबांनी उपस्थित केला आहे.
अकोला जिल्ह्यात गेल्या २५ वर्षांत तब्बल ३,२७७ शेतकऱ्यांनी ताण-तणाव, कर्जबाजारीपणा आणि सरकारी अपयशाच्या ओझ्याखाली जीव दिला आहे. ही संख्या आत्महत्यांची केवळ भिषणता दाखवत नाहीतर कृषी धोरणांच्या अपुऱ्या अंमलबजावणीची ओरडणारी साक्ष देत आहे.