
अकोला : पंजाब येथील खनौरी बॉर्डर येथे हमीभावाच्या कायद्याच्या मागणीसाठी गत अकरा महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यातील शेतकरी पुत्र अक्षय भाऊराव राऊत यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. शेतकरी जागर मंचच्या वतीने आयोजित या आंदोलनात शेतकरी सहभागी झाले होते.