esakal | अकोला : यंदाही फवारणीचा फास; १४ विषबाधितांवर उपचार सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

अकोला : यंदाही फवारणीचा फास; १४ विषबाधितांवर उपचार सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकाेला : सध्या पिकांच्या मशागतीला वेग आलेला असतानाच कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याचे सत्र जिल्ह्यात सुरू झाले आहे. फवारणीमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ४४ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली असून सध्याच्या स्थितीला १४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. याव्यतिरीत्क उपचाराअंती ३० जण बरे सुद्धा झाले आहेत. त्यामुळे आधीच अतिवृष्टी व नापिकीने हताश झालेल्या शेतकऱ्यांमध्ये आता विषबाधेचा धोका अधिक गडद झाल्याचे दिसून येत आहे.

सन् २०१८ मध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शेतमजूर तसेच शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या हाताळणीमुळे विषबाधा झाली हाेती. त्यावेळी यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीचे सर्वात जास्त बळी गेले हाेते. अकाेला जिल्ह्यात सुद्धा कीटकनाशक फवारणीमुळे ११ शेतमजूर व शेतकऱ्यांचा मृत्यू झाला हाेता. त्यामुळे विषबाधा प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अमरावतीचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) गठित केले हाेते.

हेही वाचा: बुलडाणा : बापाचा खून करणाऱ्या मुलीस न्यायालयीन कोठडी

सदर घटनेनंतर यावर्षी सुद्धा कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधेच्या घटना समोर येत आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यासह जवळपासच्या परिसरातील ४४ शेतकरी व शेतमजुरांना एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत फवारणीतून विषबाधा झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यापैकी १४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

जहाल कीटकनाशामुळे धोका वाढला

कीटकनाशक फवारणीमुळे २०१८ मध्ये जिल्ह्यातील ११ शेतमजुरांचा मृत्यू झाला हाेता. त्यामुळे शासनाने विदर्भातील पाच जिल्ह्यात पाच विविध प्रकारच्या कीटकनाशकांच्या वितरण, विक्री व वापराव निर्बंध घातले हाेते. परंतु सदर निर्बंध केवळ एक वर्षासाठीच लावण्यात आले होते. परंतु त्यानंतर त्यावरील निर्बंध उठवण्यात आल्याने ते बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे यंदा सुद्धा कीटकनाशक फवारणीचा फास आवडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुढील काळात शेतांमध्ये फवारणीची लगबग सुरू होईल. यावेळी कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मजुरांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. सदर बाब लक्षात घेवून जिल्ह्यात कीटकनाशकांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४४ कीटकनाशक विषबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १४ जणांवर उपचार करण्यात येत आहे.

- मुरली इंगळे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकाेला

loading image
go to top