Akola : कापूस चोरांकडून हिवरखेड परिसरात दहशत

कापूस चोरीच्या घटनांमुळे शेतकरी हवालदिल
cotton Akola
cotton Akolaesakal

हिवरखेड : हिवरखेडसह परिसरात कापूस चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून, कापूस चोरट्यांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.

हिवरखेड भवानी मंदिर मागे तळेगाव कच्चा रस्त्या मार्गे असलेल्या शेतशिवारात शेतातील पिके व शेत साहित्य चोरीचे अनेक प्रकार घडत आहेत. हिवरखेड येथील शेतकरी संदीप अरुण बोडखे या शेतकऱ्याच्या सर्व्हे क्र.२३२ मधील कपाशी पिकाचे जवळपास एक एकर पीक चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार हिवरखेड पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. वारंवार या परिसरात चोरटे शेतकऱ्याचा तोंडचा घास हिसकावून नेत असल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे.

संदीप बोडखे यांच्या शेतातील २० हजार रुपये किंमतीची कपाशी वेचून चोरट्यांनी चोरून नेले. फिर्यादीच्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकावर हात साफ करणाऱ्यांना चोरट्यांना पकडण्यात पोलिस आतापर्यंत अपयशी ठरल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. कापूस व शेत साहित्य चोरट्यांचा बंदोबस्त तातडीने होण्याकरिता त्यांना जेरबंद करणे अत्यावश्यक आहे. पोलिसांनी कापूस चोरीचे प्रकरण गांभीर्याने घ्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे.

कापूस चोरीबाबत शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून, चोरट्यांचा शोध घेणे सुरू आहे.

- विजय चव्हाण, पोलिस निरीक्षक, हिवरखेड.

पिकांची एवढी देखरेख केल्यावरही चोरट्यांनी आमच्या तोंडचा घास चोरून नेला, मध्य रात्रीला माझ्या शेतातील कापूस वेचून चोरट्यांनी चोरून नेल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला. पोलिसांनी चोरट्यांना तत्काळ अटक करावी व चोरट्यांचा बंदोबस्त करावा.

- संदीप बोडखे, फिर्यादी शेतकरी, हिवरखेड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com