अकोला : जिल्ह्याची सुधारित पैसेवारी ५३ पैसे जाहीर

९९० गावांतील पीक परिस्थितीची पाहणी
Farmer-Kharip-Crop
Farmer-Kharip-Cropsakal media

अकाेला : जिल्ह्यात यावर्षी झालेला ढगफूटी सदृष्ट पाऊस व अतिवृष्टीमुळे (heavy rainfall) शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान (farmers loss) झालेले असतानाच खरीप पिकांच्या (kharip crops) नजरअंदाज पैसेवारीनंतर आता जिल्हा प्रशासनाने सुधारित नजरअंदाज पैसेवारी सुद्धा सरासरी ५३ पैसे जाहीर केली आहे. खरीपातील लागवडी याेग्य ९९० गावांचा यात समावेश आहे. यंदा पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे जिल्ह्यातून कोरडा दुष्काळ गायब झाला असला तरी ओल्या दुष्काळाचे (wet draught) संकट शेतकऱ्यांवर आहे.

Farmer-Kharip-Crop
ऑनलाइन शॉपिंगकडे कल; दिवाळीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला पसंती

त्यातच जिल्हा प्रशासनाने सन् २०२१-२१ वर्षासाठीची सुधारित नजरअंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक जाहीर केल्यामुळे तूर्तास तरी जिल्ह्यातील पीक परिस्थिती उत्तम असल्याची मोहर पैसेवारीने लागली आहे, परंतु वास्तविकता मात्र वेगळी आहे. खरीप पिकांची पैसेवारी महसूल विभाग कृषी विभागाच्या मदतीने दरवर्षी जाहीर करत असतो. या पैसेवारीचा संबंध दुष्काळासंदर्भात येत असल्यामुळे पर्जन्यमान कमी अथवा अधिक झाल्यानंतर पिकांच्या उत्पादकतेवरील परिणाम पैशांच्या स्वरूपात प्रकट करण्याचे सूत्र आहे. हीच परंपरा मागील अनेक वर्षांपासून रूढ झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास या पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागते.

दर वर्षी सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज पैसेवारी जाहीर होते. ऑक्टोबरमध्ये सुधारित नजरअंदाज तर डिसेंबर महिन्यात अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. या पैसेवारीनंतर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवत असते. ५० टक्क्यांच्या खाली पैसेवारी निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व ५० टक्क्यांच्यावर निघाल्यास पीक परिस्थिती उत्तम हे पैसेवारीचे समीकरण आहे. जिल्ह्यात १०१२ गावे असून, त्यातील ९९० गावे खरीप पिकांची लागवडी याेग्य आहेत. त्यामुळे यंदा पाहणी करण्यात आलेल्या ९९० गावांमधील सुधारित नजरअंदाज पैसेवारी सरासरी ५३ पैसे असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Farmer-Kharip-Crop
तेल्हारा तालुक्यातील ८८ गावातील ग्रामस्थांची पाण्यासाठी होते पायपीट!

अंतिम पैसेवारी लावणार दुष्काळाची मोहोर

खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ३० सप्टेंबर रोजी सरासरी ५९ पैसे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता २९ ऑक्टोबर रोजी प्रशासनाने सुधारित पैसेवारी जाहीर केली, तर डिसेंबर महिन्यात अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येईल. त्यानंतरच जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीवर शासन व प्रशासन मोहोर लावेल, परंतु असे असले तरी सततची अतिवृष्टी, नदी व नाल्यांच्या पुरामुळे खरडून गेलेली शेतजमीन आणि अतिपावसामुळे पिकांची झालेली हानी यामुळे सध्या जिल्ह्यात ओला दुष्काळ असल्याचे दिसून येत आहे.

दीड लाखांवर हेक्टरवरील क्षेत्राची हानी

जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी, ढगफुटी सदृष्य पावसामुळे दीड लाख हेक्टरर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे ९ हजार ३८.०७ हेक्टर वरील शेत जमीन खरडून गेली. हे नुकसान २१ ते २४ जुलै आणि ६ ते ९ सप्टेंबर या दाेन टप्प्यातील अतिवृष्टीमुळे झाले आहे. याव्यतिरिक्त ऑगस्ट महिन्यात सुद्धा सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. असे असल्यानंतर सुद्धा आधी जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक तर आता सुधारित नजरअंदाज पैसेवारी सुद्धा ५३ पैसे जाहीर करण्यात आल्यामुळे अतिवृष्टीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांवर अस्मानीसह सुलतानी संकट सुद्धा असल्याचे दिसून येत आहे.

तालुकानिहाय खरीप पिकांची पैसेवारी

तालुका गाव नजरअंदाज सुधारित

अकाेला १८१ ५५ ५२

अकाेट १८५ ६४ ५३

तेल्हारा १०६ ५६ ५२

बाळापूर १०३ ६४ ५२

पातूर ९४ ५८ ५४

मूर्तिजापूर १६४ ५६ ५३

बार्शीटाकळी १५७ ५८ ५४

एकूण ९९० ५९ ५३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com