अकोला : कमिशनसाठी ३१ मे रोजी ‘नो पर्चेस डे’

पेट्रोल-डिझेल खरेदी करणार नसल्याचा दिला इशारा
Akola No Purchase Day 31May
Akola No Purchase Day 31Mayesakal

अकोला : देशातील पेट्रोलियम डीलर्सनी ता. ३१ मे रोजी ‘नो-पर्चेस दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे झालेल्या नुकसानीची केंद्र सरकारकडून भरपाईची मागणी यानिमित्ताने करण्यात येणार आहे. ‘नो पर्चेस डे’ असल्याने डीलर्स इंधन कंपन्यांकडून पेट्रोल खरेदी करणार नाही. मात्र, पंपांवरून वाहनधारकांना इंधन विक्री केली जाईल. डीलर्सनी इंधन खरेदी न करण्याचा निर्णयामुळे काही ठिकाणी ‘नो स्टॉक’ बोर्ड लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘नो पर्चेस डे’बद्दल अकोला जिल्हा पेट्रोल-डिझेल डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार सर्वच ऑइल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना निवेदन देवून ता. ३१ मेच्या आंदोलनाबाबत माहिती दिली आहे. तातडीने याबाबत निर्णय घेण्याची विनंती त्यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे. सन२०१७ पासून कंपन्यांनी डीलरच्या कमिशनमध्ये वाढ केलेली नाही. इंधनाचे दर वाढल्याने त्यांची गुंतवणूक वाढत असताना नफा कमी झालेला आहे. त्यामुळे कमिशनमध्येही वाढ करण्याची मागणी केलेली आहे.सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि डीलरचे कमिशन वाढविण्यासाठी ‘नो पर्चेस डेचे‘ हत्त्यार उपसले. देशभरातील सर्वच पंप चालक यात सहभागी होणार आहे.

इंधनावरील करांचा भार कमी केल्याने दर कमी होतील. मात्र, महागाईवर त्याचा फार तर अर्धा ते पाऊण टक्का परिणाम होऊ शकतो. वाहतुकीच्या इंधन खर्चात बचत होऊ शकते. वाढलेल्या वस्तूंच्या किमती किती कमी होऊ शकतील, हे आताच सांगता येणार नाही. मात्र, वाहतूकदारांची बैठक घेऊन यावर मार्ग काढणे अपेक्षित असल्याचे अकोला जिल्हा पेट्रोल-डिझेल डीलर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राहुल राठी यांनी सांगितले.

येत्या मंगळवार, ता. ३१ मे रोजी आम्ही पेट्रोपपंच संचालक कंपन्यांकडून इंधन खरेदी करणार नसले तरी पंपांवरून ग्राहकांना विक्री मात्र सुरळीत सुरू राहणार आहे. विक्रीमध्ये बाधा येणार नाही.

- राहुल राठी, जिल्हाध्यक्ष, अकोला जिल्हा पेट्रोल-डिझेल डीलर्स असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com