अकाेला : ओव्हरटेकच्या नादात गमावला प्राण...

एक जण जागीच ठार, एक युवक गंभीर; व्याळा जवळील घटना
Akola goods carrier and bus accident during overtake
Akola goods carrier and bus accident during overtakesakal

बाळापूर : भरधाव मालवाहू वाहनाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील व्याळा जवळ रविवारी सकाळी घडली.

अपघातात मालवाहू वाहनाचा चालक अजय सुभाषराव तिकांडे (वय ४६ रा. बोरगाव धर्माळे) जागीच ठार झाला आहे. त्याच्या सोबतीला असलेला गजानन धर्माळे (वय ३० रा. बोरगाव धर्माळे) जिल्हा अमरावती गंभीर जखमी झाला आहे. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाल्याने अनेक वाहन चालकांना मानसिक त्रास सहन करावा लागला.

मिळालेल्या माहितीवरून रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नागपूर-शेगाव हि शेगाव आगाराची एमएच-०६-बीडब्ल्यू-३५६२ क्रमांकाची भरधाव शिवशाही बस प्रवासी घेऊन शेगावकडे जात होती. एमएच-२७-बीएक्स-२२३१ क्रमांकाचा टाटा एस मालवाहू वाहन अकोल्याकडे जात होता. दरम्यान व्याळा-कान्हेरी (गवळी) दरम्यान ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेला टाटा एस समोरून येणाऱ्य शिवशाही बसवर आदळला. यामुळे अपघात होऊन टाटा एस मालवाहू वाहनाचा चालक अजय तिकांडे हा जागीच ठार झाला व गजानन धर्माळे हा युवक जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिस व हायवे पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातातील जखमीला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात हलविले.

महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला खोळंबा निर्माण झाला होता. बाळापूर पोलिस व हायवे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com