Akola : पदवीधर मतदार नोंदणीला मुदतवाढ

अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतरही करता येणार नोंदणी
पदवीधर मतदार
पदवीधर मतदार esakal

अकोला : अमरावती विभाग पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करण्याची मुदत निश्चित करण्यात आली होती. त्यासोबतच याच दिनांकापर्यंत दावे स्वीकारण्यात येणार होते. परंतु आता विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी निवडणूक आयोगाकडून प्राप्त सूचनेनुसार पदवीधर मतदार नोंदणीला मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार २३ नोव्हेंबर रोजी प्रारुप व ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर सुद्धा मतदार नोंदणी करता येईल.

विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया सध्या सुरू असून, त्याची मुदत ७ नोव्हेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनामार्फत मतदार नोंदणीकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. त्यासाठी क्षेत्रनिहाय सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा पदनिर्देशित अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती

अकोला महापालिका, नगरपालिका, ग्रामीण व तालुका क्षेत्रातील मतदारांचे अर्ज नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडे व संगणकीय प्रणालीमध्‍ये नोंदणी करण्याची सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यासोबतच गत दोन दिवसांपासून शासकीय सुटीच्या दिवशी सुद्धा अर्ज स्वीकारण्यात येत होते. दरम्यान मतदार नोंदणीची मुदत ७ नोव्हेंबररोजी संपत असतानाच आयोगाने मतदार नोंदणीला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मतदारांसह राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना सुद्धा सुविधा झाली आहे. यासंबंधिचा आदेशच विभागीय आयुक्तांनी जारी केला आहे.

काय आहे आदेशात

भारत निवडणूक आयोगाच्या १ नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित अमरावती विभागातील पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत ७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत दावे स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे. तथापि याच कार्यक्रमाअंतर्गत २३ नोव्हेंबर पर्यंत प्रारुप मतदार यादीची प्रसिद्धी झाल्यानंतर २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत पुन्हा दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून या काळात सुद्धा पदवीधर मतदार संघाची मतदार नोंदणी करता येईल. तसेच ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही, निरंतर मतदार नोंदणी निवडणुकीसाठी उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत करता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com