esakal | ग्रामपंचायत निवडणूकीला जात आली आडवी, निवडणूक लढविण्यासाठी पोच पावतीसाठी झुंबड
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Gram Panchayat News Going to the polls to fight for the important election

जिल्ह्यात २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुकाला जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा प्रस्ताव सादर केल्याची पोच पावती उमेदवारी अर्जासोबत देणे आवश्यक झाले आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीला जात आली आडवी, निवडणूक लढविण्यासाठी पोच पावतीसाठी झुंबड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला :  जिल्ह्यात २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुकाला जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा प्रस्ताव सादर केल्याची पोच पावती उमेदवारी अर्जासोबत देणे आवश्यक झाले आहे.

त्यामुळे निवडणुकीत भाग्य आजमवणारे इच्छुक जात पडताळणीचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात गर्दी करत आहेत. बुधवारनंतर गुरूवारी सुद्धा सदर कार्यालयात इच्छुक महिला, पुरूषांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या विश्वासाचं बियाणं करतंय दरवर्षी सहाशे कोटींची उलाढाल, महाबीजचा असा चालतो कारभार

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींपैकी २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.

प्रमाणपत्र नसल्यास इच्छुकाने पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यपत्र किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा (पोच पावती) जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले उमेदवार जात पडताळणी कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यासाठी गर्दी करत आहेत.

हेही वाचा - पाचशे रुपये द्या अन्यथा बाळ देणार नाही, प्रसुती झालेल्या महिलेची रुग्णालयाकडूनच अडवणूक

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुधवार (ता. २३) पासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे सदर कार्यालयात निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या महिला व पुरूष प्रस्ताव घेवून पोहचत आहेत. परिणामी गत दोन दिवसांपासून सदर कार्यालयात नागरिकांची तोबा गर्दी होत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image