मित्रांसोबतच्या पार्टीचे बेत हुकले, तीन दिवसांच्या लॉकडाउनमुळे गटारीही "लॉक', आषाढातील शेवटच्या रविवारी मांसाहारींची झाली निराशा

विवेक मेतकर
Monday, 20 July 2020

श्रावण मास सुरू होण्यापूर्वी आणि आषाढातील शेवटचा रविवार म्हणजे मांसाहार करणाऱ्या खवय्यांसाठी पर्वणीच. कोकणातील गटारी अमावसेप्रमाणेच वऱ्हाडातही खवय्ये "एन्जॉय' करतात. यावर्षी मात्र आधीच कोरोनाची धास्ती व त्यात शनिवारपासून अकोला जिल्ह्यात करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या लॉकडाउनमुळे मासांहार खवय्यांची गटारीचा "एन्जॉय'ही लॉक झाला.

अकोला  ः श्रावण मास सुरू होण्यापूर्वी आणि आषाढातील शेवटचा रविवार म्हणजे मांसाहार करणाऱ्या खवय्यांसाठी पर्वणीच. कोकणातील गटारी अमावसेप्रमाणेच वऱ्हाडातही खवय्ये "एन्जॉय' करतात. यावर्षी मात्र आधीच कोरोनाची धास्ती व त्यात शनिवारपासून अकोला जिल्ह्यात करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या लॉकडाउनमुळे मासांहार खवय्यांची गटारीचा "एन्जॉय'ही लॉक झाला.

अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी दोन हजारांचा टप्पा पार केला. मृत्यूनेही शतक गाठले. त्यामुळे प्रशासनाने कोरोना विषाणू कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने अनेक कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यात शनिवारपासून मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंत करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या लॉकडाउनचाही समावेश आहे. नेमके याच तीन दिवसांत आषाढातील शेवटचा रविवार आणि गटारी अमवषा लागून आली. त्यामुळे मांसाहारी खवय्यांची चांगलाच हिरमोड झाला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

वाईनशॉप बंदचा गम
गटारी अमवसेचा आनंद खवय्यांना घेता आला नाही. त्यातच वाईनशॉपही तीन दिवसांच्या लॉकडाउनमुळे बंद असल्याने त्याचाही गम गटारी "एन्जॉय' करणाऱ्यांना असल्याचे दिसून आले.

अकोल्यात रेल्वे कोच फॅक्‍टरीसाठी 100 कोटीचा प्रस्ताव

छुप्या मार्गाने विक्री
तीन दिवसांचा लॉकडाउन असला तरी शहरातील काही भागातून रविवारी सकाळीच छुप्या मार्गाने मांस विक्री झाली. मासोळी, मटण, चिकनसाठी आधीपासूनच खवय्यांनी विक्रेत्यांसोबत संपर्क साधून व्यवस्था केली होती. त्यामुळे बंदमध्येही काहींना आषाढातील शेवटचा रविवार छुप्या मार्गाने का होईना पण "एन्जॉय' करता आला.

महाबीजचे पत्र म्हणजे, स्वत:ची कातडी वाचविण्याचा प्रयत्न! : रविकांत तुपकर

मित्रांसोबतच्या पार्टीचे बेत हुकले
श्रावण मास सुरू झाला की पुढील महिनाभर मांसहार अनेकजण बंद ठेवतात. त्यामुळे आषाढातील शेवटच्या रविवारी दरवर्षी ढाबे, हॉटेल खवय्यांनी हाऊसफुल्ल झालेले दिसून येत. यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आधीच हॉटेल, धाब्यांवर बंदी. त्यात पार्सल सुविधा सुरू असली तरी तीन दिवसांच्या लॉकडाउनने त्यावरही पाणी फेरले. त्यामुळे मित्रांसोबतच पार्टीचा बेतही हुकल्याची खंत अनेकांनी बोलून दाखवली.

पशुपालकांचे नुकसान, विक्रेत्यांचा फायदा
पोल्ट्री फार्म, शेळी पालन करणाऱ्यांसाठी गटारी अमावसेच्या निमित्ताने चांगल्या उत्पन्नाची हमी असते. मात्र यावर्षी पशुपालकांचे कोरोनाने मोठे नुकसान केले. त्यात तीन दिवसांच्या लॉकडाउनने आषाढातील शेवटच्या रविवारची संधीही गेली. विक्रेत्यांनी मात्र स्वतःत शेळी, कोंबड्या विकत घेवून लॉकडाउनच्या नावाखाली ग्राहकांना चढ्यादराने विक्री करून मोठा नफा कमावीला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola gutari also locked due to three-day lockdown, non-vegetarians disappointed on last Sunday of Ashadha