esakal | हेट स्टोरी: अन् तिचे प्रेम हरले, प्रेमविवाह केलेल्या मुलीची पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Hate Story: Anti loses her love, girl commits suicide after being harassed by her husband

कुटुंबियासह समाजाचा रोष पत्करून प्रेमविहार करणाऱ्या तरूणीने अखेर त्याच्याच छळाला कंटाळून आत्महत्या केल्याने प्रेमविवाहाचा करून अंत झाला. हिवरखेड येथील या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून, परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी हिवरखेड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेट स्टोरी: अन् तिचे प्रेम हरले, प्रेमविवाह केलेल्या मुलीची पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या

sakal_logo
By
धीरज बजाज

हिवरखेड (जि.अकोला) : कुटुंबियासह समाजाचा रोष पत्करून प्रेमविहार करणाऱ्या तरूणीने अखेर त्याच्याच छळाला कंटाळून आत्महत्या केल्याने प्रेमविवाहाचा करून अंत झाला. हिवरखेड येथील या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून, परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी हिवरखेड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


सिरसोली येथील एका मुलीचे येथून जवळच असलेल्या काळेगाव येथील शुभम हिवराळे या मुलासोबत प्रेम जडले. जन्मोजन्मी साथ निभावण्याच्या आणि एकमेकांसोबत सुखी आयुष्य जगण्याच्या आणाभाका दोघांनी घेतल्या. मुलीला पालकांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु म्हणतात ना, प्रेम आंधळे असते. अखेर मुलीने सज्ञान होताच पालकांचे इच्छेविरुद्ध शुभम हिवराळे सोबत पालकांच्या इच्छेविरुद्ध प्रेमविवाह केला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

काही दिवस माहेरच्यांच सोबत मुलीचा संपर्क नव्हता. लग्नापूर्वी प्रेमाचे आयुष्य आणि लग्नानंतरचे सांसारिकजीवन यामधील फरक लवकरच तिच्या लक्षात आला. प्रेम विवाहामुळे हुंडा न मिळाल्यामुळे तिचा छळ होऊ लागला. माहेरची बेताची स्थिती असल्याने हुंडा देणे शक्‍य नसल्याचे सासरच्यांना सांगितले. नंतर तिला दिवस राहिले आणि तिने एका मुलीला जन्म दिला.

मुलीचा जन्म झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा आणखी छळ सुरू केला. आम्हाला मुलगा पाहिजे होता, तुला मुलगी झाली, तू अपशकुनी आहेस, हुंडा सुद्धा आणला नाहीस, असे टोमणे मारून तिचे जगणे कठीण केले. एवढेच नव्हे तर त्यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेणे सुद्धा सुरू केले.

शाळेत फिरयला गेला... अन् अचानक त्याने केला मुख्याध्यापकावरच गोळीबार

नवविवाहित मुलीने काही दिवसांत सर्व चांगले होईल या आशेवर आणि मुलीच्या भविष्याचा विचार करीत सर्व छळ सहन करत गेली. परंतु शेवटी पतीचा आणि सासरच्या मंडळीचा जाच असह्य झाला. तिने हीबाब काही कामानिमित्त सिरसोली येथे आली असता पालकांना सांगितली.

पालकांनी समजूत काढल्यानंतर मुलगी काही दिवस आणखी त्रास सहन करत राहिली. अखेर छळाला कंटाळून ता. 21 जुलै रोजी तिने विष प्राशन करून आत्महत्या केली आणि प्रेमविवाहाचा करून अंत झाला.

अकोला-अकोट ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या चाचणीला सुरुवात

सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल
हिवरखेड येथील या घटनेची फिर्याद मुलीच्या वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यावरून हिवरखेड पोलिसांनी आरोपी पती शुभम शंकर हिवराळे, सासरा शंकर हिवराळे, मामा गजानन हंगामे या तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास ठाणेदार आशिष लवंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेड पोलिस करत आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)