अकोला : पावसाचा जोर कायम, खरीप पिके संकटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rains

अकोला : पावसाचा जोर कायम, खरीप पिके संकटात

अकोला : सलग तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारपासून पावसाने जिल्हाभर दमदार हजेरी लावली. गुरुवारीही दुपारी धो-धो पाऊस झाला. शुक्रवारी दुपानंतर पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यामुळे जिल्ह्यातील खरीप पिके संकटात सापडले असून, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे पिके जोमाने येण्याची अपेक्षा होती. मात्र ऑगस्टनंतर या महिन्यात सातत्याने पावसाची रिपरिप सुरू असल्याने खरीपातील पिके अडचणीत आली आहे. शेतात पाणी साचले असल्याने मशागतीची कोणतीही कामे करता येत नाही.

हेही वाचा: मोदी-बायडेन यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा

सोयाबीन काढणीसाठी आले असून, पावसाने सोयाबीनच्या शेंगांना शेतातच कोंब फुटू लागले आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्या जात आहे. काही भागात मॉन्सून पूर्व कपाशीची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे कापूस वेचणीला आला आहे. मात्र, पावसाची सतत रिपरिप सुरू असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

पिंजर परिसरात धो,धो पाऊस

गेले तीन दिवसांपासून पिंजर आणि परिसरात पावसाने मोठी दाणादाण केली आहे. शुक्रवारी, ता २४ सप्टेंबर रोजी सकाळी आणि सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. पिंजर, दोनद, खेरडा, शेलू, भेंडी, वडगाव, उमरदरी, निहिदा, सावरखेड, हांडे, धाकली, चांभारे, पराभवानी, मोरहळ, भेंडगाव, हातोला, सालपी, महान, झोडगा, आदी ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावून दाणादाण उडविली.

गत २४ तासात जिल्ह्यातील पाऊस

अकोट : १०.७ मि.मी.

तेल्हारा : २ मि.मी.

बाळापूर : १४.४ मि.मी.

पातूर : १२.५ मि.मी.

अकोला ; १६.३ मि.मी.

बार्शीटाकळी : १७.१ मि.मी.

मूर्तिजापूर : १०.६ मि.मी.

जिल्हा सरासरी : १२.४ मि.मी.

loading image
go to top