अकोला : महसूलच्या जागेवर अवैध बांधकाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महसूलच्या जागेवर अवैध बांधकाम

अकोला : महसूलच्या जागेवर अवैध बांधकाम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः महानगरपालिकेच्या हद्दीतील महसूलच्या जागेवर अवैध बांधकाम केले जात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. महानगरपालिकेच्या लेखी जुना रस्ता व सर्व्हिस गल्ली असलेल्या या जागेवरील बांधकामाबाबत महानगरपालिकाच अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अकोला महानगरपालिका हद्दीतील खुल्या भूखंडांवर अनेकांनी अवैधपणे ताबा केला आहे. काही ठिकाणी तर चक्क नाल्यांवरच बांधकाम करण्यात आले. जुन्या सर्व्हिस गल्ल्याही गायब होताना दिसत आहे. याकडे महानगरपालिकेची डोळेझाक होत असल्याने आहे त्या जागाही ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

हेही वाचा: दिल्लीत लॉकडाऊनची तयारी, 'आप' सरकारची कोर्टात माहिती

असाच एक प्रताप अकोला महानगरपालिका हद्दीतील मुख्य पोस्ट ऑफिसच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेवर काहींची वक्रदृष्टी असल्याचे दिसून येत आहे. पोस्ट ऑफिसच्या मागे शाळेच्या आवारभिंतीला लागून असलेली मोकळी जागा ही महानगरपालिकेचा लेखी जुना रस्ता व सर्व्हिस गल्ली आहे.

मात्र, सध्या येथे काही लोकांनी दोन्ही बाजूने भिंत उभी करण्याचे काम सुरू केले आहे. ही जागा ताब्यात घेण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या बांधकामाबाबत मनपा प्रशासन मात्र अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सत्ताधारी नगरसेवक म्हणात, आमचा संबंध नाही!

प्रभाग क्रमांक १२ मधिल पोस्ट ऑफिसच्या मागे असलेल्या जागेवर अवैध बांधकाम सुरू आहे. या जागेवर सुरू असलेल्या बांधकामाशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे मनपातील भाजप सत्ताधाऱ्यांनी सांगितले.

कोणतेही काम प्रस्तावित नाही!

महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडे या जागेवरील बांधकामाबाबत विचारणा केली असता मनपा प्रशासनाकडून येथे कोणतेही काम किंवा बांधकाम प्रस्तावित करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. ही जागा सर्व्हिस गल्ली असल्याची माहिती देण्यात आली.

बागेच्या नावावर जागेवरील ताब्याचा प्रयत्न

यापूर्वी याच जागेवर बाग तयार करण्याच्या नावाखाली बांधकाम करण्याचा प्रयत्न झाला होता. तत्कालीन आयुक्तांच्या सावधगिरीमुळे हा डाव हाणून पाडण्यात आला होता. आता पुन्हा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर येथे अवैध बांधकाम सुरू आहे. त्यामागे नेमके कोण आहे,याचा शोध मनपा प्रशासनाने घेवून येथील अवैध बांधकाम थांबविण्याची मागणी होत आहे.

loading image
go to top