अकाेला : रिसोड तालुक्यात बेलगाम रेती वाहतूक

महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज
Akola illegal sand transportation in Risod revenue department
Akola illegal sand transportation in Risod revenue departmentsakal

रिसोड : मागील काही दिवसांपासून रिसोड तालुक्यात रेती वाहतूक बेलगाम झाली असून रिसोड ते लोणार या रस्त्यावर दुचाकी व इतर वाहनधारकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. २१ मे व २५ मे रोजी झालेल्या टिप्परच्या अपघाताने ही बाब अधोरेखित झाली आहे. महसूल प्रशासनाला लाखोंचा चुना लावला जात आहे. पावसाळा जवळ आल्यामुळे रेती माफिया रेती विक्री पेक्षा साठवणुकीवर अधिक भर देत आहेत. महसूल विभागाने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे

मंठा तालुक्यातील तळणी, ऊस्वाद, कानडी यासह इतर वाळू घाटावरून वाशीम जिल्ह्यात लोणारमार्गे वाळूचे टिप्पर मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस वाळू वाहतूक करीत आहेत. लोणार ते रिसोड हा रस्ता नवीन झाला आहे. २१ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजताचे दरम्यान रेतीने भरलेल्या टिप्परने मोरगव्हाण गावात एका विवाह सोहळ्यातील वधूवरांच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर २५ मे रोजी वाळूने भरलेले टिप्पर सुसाट वेगाने धावत असतांना मोप या गावाजवळ अनियंत्रित झाल्यामुळे पलटी झाले.

सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये जीवित हानी झाली नसली तरी वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा जवळ आल्यामुळे वाळू माफियांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. बेधुंद व ओव्हरलोड वाळूची वाहतूक होत आहे. या बाबीकडे गावातील तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत आहे. ही वाहने सुसाट वेगाने धावत आहेत, याकडे महसूल विभाग, वाहतूक विभागाने तात्काळ लक्ष देऊन ओव्हरलोड व सुसाट वाहतुकीला लगाम घालून शासनाच्या महसूल मध्ये भर घालण्यासाठी पुढाकार घ्यावा त्याचप्रमाणे वाहतूक विभागाने कर्णकर्कश हॉर्नवर बंदी घालावी कारण या रस्त्यावर शाळा व महाविद्यालये आहेत.

पावसाळा जवळ आल्यामुळे रेती माफियांनी रेतीचे भाव वाढविले असले तरीही विक्री पेक्षा साठवणुकीवर अधिक भर दिला जात आहे. शहरासह ग्रामीण भागात केली जाणारी वाळू विक्री विना गौण खनिज पावती केली जात आहे. एकाच गौण खनिज पावतीवर एकापेक्षा जास्त वेळा वाळू वाहतूक करण्यासाठी वाळू वाहतूकदार दिवसभर त्याच त्या पावतीचा वापर करीत आहेत. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असल्याची चर्चा आहे. ओव्हरलोड, सुसाट व बेलगाम झालेल्या वाळू वाहतुकीला लगाम घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com