अकाेला : प्रवासी वाहनावर माहिती फलक सक्तीचा

प्रवाशांना मिळणार वाहन व वाहनचालकाची माहिती
Akola Information board on passenger vehicle mandatory
Akola Information board on passenger vehicle mandatory sakal

अकोट : प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या दर्शनी भागात चालकांची पूर्ण माहिती, वाहनाचा क्रमांक, परवाना क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि अन्य महत्त्वाची माहिती लावण्याची अधिसूचना शहर पोलिसांकडून काढण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे अकोट शहरात प्रवासी वाहनात बसल्यानंतर वाहनचालकाची पूर्ण माहिती प्रवाशांना मिळणार आहे. फलक नसलेली वाहने प्रवासी वाहतूक करण्यास अपात्र असून, त्यांच्यावर निर्बंध घालण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी दिली.

दरम्यान ता.१ जूनपर्यंत ८९ खासगी प्रवासी वाहनांवर दर्शनी भागात तपशील लावण्यात आला असून, वाहनधारकांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर यापुढे एम.व्ही ऍक्ट व तत्सम कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार अहिरे यांनी दिली. महिला प्रवाशांना निर्भीडपणे प्रवास करता यावा, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची फसवणूक होऊ नये, या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे, तसेच एखाद्या गुन्ह्यात आरोपींचा शोध घेताना पोलिसांची चांगलीच दमछाक होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून आता प्रवासी वाहनांमध्ये माहिती फलक बसवणे सक्तीचे करण्यात आले आहे.

यापुढे वाहनावर मोटार वाहनाचा क्रमांक, परवानाधारकाचे नाव, पत्ता, परवाना क्रमांक, परवान्याची मुदत, मोबाईल क्रमांक, चालकाचे नाव आणि पत्ता, वाहनचालक परवाना क्रमांक, चालक परवाना मुदत, वाहनचालकाचा मोबाईल क्रमांक, पोलिस मदत क्रमांक, महिला हेल्पलाईन क्रमांक असणार आहे. वाहनधारकांनी नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

- प्रकाश अहिरे, ठाणेदार, शहर पोलिस स्टेशन, अकोट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com