esakal | उद्यापासासून पावसाची दमदार बॅटींग, नुकसान टाळण्यासाठी करा पिकांचे नियोजन
sakal

बोलून बातमी शोधा

Akola: It will rain from Sunday, do crop planning to avoid damage

विदर्भात ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेले सोयाबीन, खरीप ज्वारी व कापसाचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

उद्यापासासून पावसाची दमदार बॅटींग, नुकसान टाळण्यासाठी करा पिकांचे नियोजन

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला ः हवामान खात्याच्या पूर्वानुमानानुसार विदर्भात ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेले सोयाबीन, खरीप ज्वारी व कापसाचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

सध्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन पीक कापणी सुरू आहे. बऱ्याच शेतावर कापणी करून सुखवणी करिता छोटे ढीग केलेले आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेले पीक योग्य ठिकाणी जमा करून मळणी करून घ्यावी, पिकाचे पावसापासून होणारे नुकसान टाळावे.

ज्या शेतकऱ्यांना मळणी करणे शक्य नाही, अशा शेतकऱ्यांनी जमा केलेल्या सोयाबीनची सुडी उंचवट्याच्या ठिकाणी लावून व्यवस्थित ताडपत्रीने झाकून घ्यावी, जेणेकरून सुडीमध्ये पावसाचे पाणी जावून नुकसान होणार नाहीत.

(संपादन - विवेक मेतकर)