अकाेला : पेट्रोल पंपावरच अवैध पेट्रोल विक्री

कापशी येथे अवैध पेट्रोल विक्रेत्यांचा सुळसुळाट; ज्यादा दराने केली जाते विक्री
Akola Kapashi Illegal petrol sale at higher rate petrol pumps
Akola Kapashi Illegal petrol sale at higher rate petrol pumpssakal

बार्शीटाकळी : नियम धाब्यावर बसवून कापशी रोड येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध पेट्रोल विक्रीमुळे वाहनचालकांची आर्थिक लूट केली जात आहे, मात्र याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने ज्वलनशील पदार्थाच्या सुरक्षेचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. अवैध पेट्रोल विक्रीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.

अकोला तालुक्यातील कापशी रोड येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल उपलब्ध नसल्याने दोन-तीन दिवसांपासून तो बंद आहे, त्यामुळे वाहनधारकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. याचाच फायदा अवैध पेट्रोल व डिझेल विक्रेत्यांकडून केल्या जात आहे. गरजू व्यक्तींना ज्यादा दराने विक्री करून त्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोला-कापशी रोडवर अनेक वर्षांपासून पेट्रोल पंप सुरू आहे, मात्र येते नेहमीच पेट्रोल व डिझेलचा तुटवडा असतो, त्यामुळे अवैध पेट्रोल-डिझेल विक्रेत्यांची बेमोसम दिवाळी असते.

अवैध पेट्रोल विक्रेते व पेट्रोल पंप वाले संगनमताने पेट्रोल पंप बंद ठेवत असावे, अशी शंका वाहनचालकांकडून व्यक्त केल्या जात आहे. परिसरातील गावामध्ये, तर पेट्रोल अवैध विक्री होते पण पेट्रोल पंपावरही दुचाकीतील पेट्रोल काढून तेथेच अवैध विक्री केल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला.

पेट्रोल पंपावर १११ रुपये दराने मिळणारे पेट्रोल अवैध विक्रेत्यांकडून १५० ते १६० रुपये दराने तेही ९०० मिलीलीटर विकल्या जात आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देवून बंद असलेला पेट्रोल पंप त्वरित सुरू करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून केल्या जात आहे.

सर्व नियम धाब्यावर

ज्वलनशील पदार्थ विक्रीसाठी शासनाने नियम व अटी लादल्या आहेत. परंतु, नियमाचे उल्लंघन करून ग्रामीण भागातील गावागावांत अनेकांनी पेट्रोल विक्रीचा गोरखधंदा सुरू केला आहे. लीटरमागे ४० ते ५० रुपये अवैध विक्रेते लूटत आहेत. त्यातच डिझेल भेसळ करून पेट्रोलची विक्री करण्यात येत असल्याने वाहनांच्या इंजिनमध्ये बिघाड होण्याचे प्रमाणही वाढले आहे, यामुळे वाहनधारकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कापशी येथे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध पैट्रोल विक्रेत्यांवर प्रशासनाकडून आजपर्यंत एकदाही कारवाई करण्यात आली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

पेट्रोल पंपावर एका दुचाकीमधून अवैध पेट्रोल विक्री करणारा आमचा कर्मचारी होता, पण आता तो आमच्याकडे काम करत नाही. पेट्रोल पंपावर तो कोणाला पेट्रोल विकत असेल तर त्याबाबत चौकशी करतो. आम्हाला गायगाव डेपोमधून पेट्रोल व डिझेल मिळाले नाही, त्यामुळे पेट्रोल पंप बंद आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णवाहिकेसाठी पेट्रोल, डिझेलचा साठा काही प्रमाणात ठेवण्यात आला आहे.

- माणिकराव कौसाल, संचालक, दत्तात्रय पेट्रोल पंप, कापशी रोड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com