काटेपूर्णाचा पाणीसाठा पोहचला 74 टक्‍क्‍यांवर, सततच्या पावसामुळे प्रकल्पातील जलसंग्रहात वाढ

सुगत खाडे  
Monday, 27 July 2020

गत आठ-दहा दिवसांपासून ग्रामीण भागात जोरदार पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील जल संग्रह प्रकल्पात पाणी संग्रहित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बीला सिंचनासाठी पाणी मिळण्याची शक्‍यता वाढली असून अकोला महानगरात राहणाऱ्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुद्धा मार्गी लागला आहे.

अकोला  ः गत आठ-दहा दिवसांपासून ग्रामीण भागात जोरदार पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील जल संग्रह प्रकल्पात पाणी संग्रहित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बीला सिंचनासाठी पाणी मिळण्याची शक्‍यता वाढली असून अकोला महानगरात राहणाऱ्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुद्धा मार्गी लागला आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा धरणात आतापर्यंत 74 टक्‍क पाणी संग्रहित झाले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सुरुवातीच्या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने प्रगती केली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचा दावा सुद्धा हवामान खात्याने व्यक्त केला होता. असे असल्यानंतर सुद्धा जिल्ह्यात पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे धरणांची पाणीपातळी तळ गाठत होती. पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील धरणांध्ये संग्रहित असलेल्या पाण्याचा वापर सुद्धा वाढला होता.

शहरी व ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी साठवलेल्या पाण्याची उचल वाढली होती. परिणामी धरणांच्या पाणीसाठ्यात सुद्धा घट होत होती. त्यामुळे जिल्हावासियांना पेयजल संकटाला सुद्धा सामोरे जावे लागू शकते, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत होती. परंतु गत एक महिन्यांपासून जिल्ह्यात कमी अधिक पाऊस होत असल्याने धरणांच्या जलग्रहण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

असा आहे पाणीसाठा
जिल्ह्यात सर्वात मोठ्या काटेपूर्णा धरणात 73.25 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यानंतर वान प्रकल्पात 40.73, मोर्णा प्रकल्पात 67.76, निर्गुणात 39.62, उमामध्ये 29.79 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Katepurna water storage reaches 74%, project water storage increased due to continuous rains