

Akola Leader Booked for Alleged 15 Year Water Theft
Esakal
शिवसेना ठाकरे गटाचे अकोला जिल्हा प्रमुख आणि जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पाणी चोरीचा आरोप त्यांच्यावर असून या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामुळे शिवसेना उबाठा गटाचे नेते गोपाल दातकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील हिंगणी गावच्या सरपंच कल्पना पळसपगार यांनी गोपाल दातकर यांच्यावरोधात तक्रार दिली होती.