अरे हे काय? लॉकडाउनमध्ये शालेय विद्यार्थी चक्क शेतात कामाला

akola In the lockdown, the schoolboy worked on a field 
akola In the lockdown, the schoolboy worked on a field 

नांदुरा, :  जवळपास चार महिन्यापासून कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेता लॉगडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्था बंद असल्याने घरात काय बसावे म्हणून आपले आईवडील घरच्या का होईना शेतीच्या कामासाठी विद्यार्थ्यांना व्यस्त करीत आहे.तर दुसरीकडे गरिबांची मुले खेळण्या बागडण्याच्या या वयातच दुसऱ्याच्या शेतात मजुरीतुन हातात खुरपी घेऊन घराला आर्थिक आधार देण्याचे काम करीत असल्याचे वास्तव सद्या पहावयास मिळत आहे.


गेल्या मार्च महिन्यापासून महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉगडाऊन जाहीर असल्याने मागील सत्राच्या परीक्षांना काही विद्यार्थ्याना हुलकावणी मिळाली आहे.तर दुसरे शैक्षणिक सत्र सुरू होण्याची शक्‍यता सद्या तरी नसल्याने विद्यार्थ्यांचा वावर हा शेतीत झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सद्या खरीप हंगामाची पेरणी आटोपली असून, पिके बहारदार अवस्थेत पावसाची चातकासारखी वाट पाहत असून बळीराजा डवरणीत व्यस्त असतांना महिला व शालेय विद्यार्थी हातात खुरपे घेऊन पिकात शेवटचा हात फिरवीत आहेत.लॉगडाऊन मुळे शाळा बंद असल्याने शेतीला विद्यार्थ्यांच्या रूपाने भरपूर प्रमाणात मजूर वर्ग उपलब्ध झाला आहे. वी पासून ते वी बारावी पर्यंतचे सर्वच ग्रामीण भागातील विद्यार्थी मजुरांचा मेळ ज्याला ग्रामीण भागात पाथ म्हटले जाते त्यात समाविष्ट झाले असून दिवसाला शे दोनशे रुपये कमवून घरादाराला हातभार लावत आहे.असे असतांना एकीकडे बालमजूर कायदा बालकांना कामांवर ठेवण्यास मज्जाव करत असला तरी ग्रामीण भागात सर्वच चालते असे काहीशे चित्र सद्या पहावयास मिळत आहे.

"शेती इंडस्ट्रीचा बोलबाला कायम
लॉगडाऊनमध्ये शहरातील कंपन्या बंद पडल्याने घराकडे परतलेल्यानाही एकाच इंडस्ट्रीने आजही रोजगार उपलब्ध करून दिला ती म्हणजे शेती होय.सद्या शेतीमध्ये सर्व वयोगटातील सर्वांसाठी वेगवेगळी कामे उपलब्ध असतांना शासनाचे चुकीचे धोरण शेतीला अडचणीत टाकत आहे.

"पाऊस पडत नसल्याने मजुरीच्या दरात घट
सद्या दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहे.मजूर जास्त व कामे कमी अशी अवस्था सद्या झाली असल्याने निंदणीचे दर रुपये प्रमाणे असून डवरणीसाठी असलेल्याला रुपये मजुरी दिली जात आहे.खरिपाच्या सुरुवातीला लागवणसाठी महिला व बालकांना रुपये तर इतर कामासाठी असलेल्या पुरुष मजुराला ते रुपये मजुरीचे दर शेतकऱ्यांना द्यावे लागले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com