अकाेला : मानोरा तालुक्यात दोन लाखांचा गुटखा जप्त

तालुका आणि ग्रामीण भागात बेकायदेशीर गुटख्याची विक्री
Akola Manora Two lakh Illegal gutka seized
Akola Manora Two lakh Illegal gutka seizedsakal

मानोरा : तालुका आणि ग्रामीण भागात बेकायदेशीर गुटख्याची विक्री केली जात असल्याची माहिती मानोरा पोलिसांना मिळाली होती. कारंजा उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुपटा येथे मारलेल्या छाप्यात सुमारे दोन लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला, त्याचबरोबर एका गुटखा माफियांवर कारवाई करण्यात आली आहे. मानोरा पोलिसांनी तंबाखूजन्य प्रतिबंधित पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची धडक मोहीम सुरू केली.

मानोरा तालुक्यात गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. त्याचप्रमाणे खुलेआम काही दुकानातून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीबी पथक व कुपटा बिट जमादार यांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी सायंकाळी धडक कारवाई करून सुमारे एक लाख ७६ हजार ३१९ रुपयांचा गुटखा जप्त केला, सर्वात आश्चर्य असे की गुटखा विक्री करणारा सुनील देशमुख यांनी किरण जाधव यांचेकडून भाड्याने घेतलेल्या घरातुन गुटखा जप्त जरण्यात आला. पोलिसांनी कुपटा येथील बाळू उर्फ सुनील नामदेव देशमुख याच्या दुकानातून १ लाख ७६ हजार ३१९ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.

जिल्हा पोलिस अधीक्षक बचनसिंग, कारंजा उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानोरा पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार महेश कुचेकर, पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर नागरे, सविता वड्डे, डीबी पथक जमादार गणेश जाधव, मयुरेश तिवारी, बालाजी महले, बन्सी चव्हाण, रोहिदास राठोड, कुपटा बिट जमादार संदीप बर्डे, शकील मुनिवाले, जगनाथ घाटे आदींनी कारवाई केली. संदीप बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुनील देशमुख यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिस उपनिरीक्षक सविता वड्डे पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com