कोरोनाचे ३१ नवे रुग्ण, १२ जणांना डिस्चार्ज, ५३६ रुग्णांवर उपचार सुरू

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 7 January 2021

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे ४२४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३९३ अहवाल निगेटीव्ह तर ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दिवसभरात १२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
 

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे ४२४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३९३ अहवाल निगेटीव्ह तर ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दिवसभरात १२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. हे सर्व ३१ अहवाल सकाळी प्राप्त झाले होते. त्यात सात महिला व २४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जिल्हा परिषद कॉलनी खडकी येथील चार, कच्ची खोली येथील तीन, गोरक्षण रोड, तुकाराम चौक, जवाहर नगर व अडसूल निंबफाटा येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित सिव्हील लाईन, आश्रय नगर, पारस, मुर्तिजापूर, तेल्हारा, अकोट, आदर्श कॉलनी, नानक नगर, मुर्तिजापूर रोड, गणेश नगर, खडकी, जठारपेठ, कौलखेड, गीता नगर, रामदास पेठ व डाबकी रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. मंगळवारी रात्री रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात १० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते.

हेही वाचा - आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’

दिवसभरात बारा रुग्ण बरे
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी अधीक होत असली तरी बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या कायम आहे. बुधवारी दुपारनंतर बिहाडे हॉस्पिटल व स्कायलार्क हॉटेल येथून प्रत्येकी तीन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले सहा अशा एकूण १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा -  औरंगाबादचं नामांतर: ठाकरे यांचा शिवसेनेसह मित्रपक्षांना टोला

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५०० वर
जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १० हजार ७२८ पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ३२३ जणांचा मृत्यू झाला आहे. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ९८६९आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५३६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News 31 new corona patients, 12 discharged, 536 patients undergoing treatment