
पश्चिम विदर्भातून मुंबईकरीत धावणारी एकमेव रेल्वे गाडी अमरावती-मुंबई अंबानगरी एक्स्प्रेस कोरोना संकट काळात बंद करण्यात आली होती. व्यापारी व प्रवाशांच्या मागणीवरून ही गाडी २५ आणि २६ जानेवारीपासून दोन्हीकडून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तुर्तास आरक्षण असणाऱ्या प्रवशांनाच या गाडीने प्रवास करता येणार आहे.
अकोला ः पश्चिम विदर्भातून मुंबईकरीत धावणारी एकमेव रेल्वे गाडी अमरावती-मुंबई अंबानगरी एक्स्प्रेस कोरोना संकट काळात बंद करण्यात आली होती. व्यापारी व प्रवाशांच्या मागणीवरून ही गाडी २५ आणि २६ जानेवारीपासून दोन्हीकडून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तुर्तास आरक्षण असणाऱ्या प्रवशांनाच या गाडीने प्रवास करता येणार आहे.
पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, अमरावती, वाशीम, हिंगोली, जळगाव या जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी सर्वात सोयीची गाडी म्हणून अंबानगरी एक्स्प्रेसला पसंती मिळत होती.
हेही वाचा - अनाथ अनुराधाचे सुख नियतिलाही पहावले नाही!
ही गाडी सुरू झाल्यापासूनच प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद या गाडीला मिळाला आहे. कोरोना संकट काळात ही गाडी इतर गाड्यांप्रमाणेच बंद करण्यात आली होती. आता शासनाने ही गाडी सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे.
त्यानुसार मुंबई येथून ता. २५ जानेवारीला आणि अमरावती येथून ता. २६ जानेवारीला ही गाडी तिच्या निर्धारित वेळेनुसार सुटणार आहे.
हेही वाचा - आता सरपंच होणार कोण, कसे असेल ग्रामपंचायतचे आरक्षण?
अंबा नगरी एक्स्प्रेस सुरू करण्यासंदर्भात अनेक व्यापारी संघटना व नागरिकांनी मागणी केली होती. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी ही गाडी सुरू करण्यासंदर्भात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे आग्रह धरला होता.
हेही वाचा - शेतात गव्हाच्या पिकाची जागल करण्याकरिता गेले अन् अचानक केला बिबट्याने हल्ला
त्यानुसार अंबानगरी एक्स्प्रेस सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवार, ता. २२ जानेवारीपासून या गाडीचे दोन्ही कडील आरक्षण सुरू होत आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी ही गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच प्रवासी संघटनांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)