esakal | शेतात गव्हाच्या पिकाची जागल करण्याकरिता गेले अन् अचानक केला बिबट्याने हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News A leopard attack in the field to wake up the wheat crop

सुखदेव शिंदे हे आपल्या शेतात गव्हाच्या पिकाची जागल करण्याकरिता गेले असता, अचानक बिबट्याने हल्ला चढवला व डोक्याला चावा घेतला.

शेतात गव्हाच्या पिकाची जागल करण्याकरिता गेले अन् अचानक केला बिबट्याने हल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

मानोरा (जि.वाशीम) : तालुक्यातील रोहना शेत शिवारात सोमवारी (ता.१८) सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान बिबट्याने सुखदेव शिंदे (वय ५५) रा. रोहना जखमी करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना आणि सोबतीला असलेल्या कुत्राला आपला जीव गमवावा लागला. आला जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

तालुक्यातील रोहना परिसरात या आधी सुद्धा ‘रोहना शिवारात वाघाचे दर्शन’ अशा मथळ्याखाली ‘सकाळ’ वृत्त प्रकाशित केले होते. तरीदेखील वनविभागाच्या भोंगळ कारभारामुळे दुर्लक्ष केल्या गेले. त्याचवेळी वनविभागाने लक्ष दिले असते तर, ही घटना घडली नसती.

हेही वाचा - पोलिसांच्या मध्यस्थिने पुन्हा जुळल्या ‘रेशीमगाठी’

त्यावेळी वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना वारंवार फोन लावला असता, त्यांचा फोन बंद येत होता. त्याचवेळी वनरक्षक पी.ए. बोरकर यांना माहिती दिली असता, त्यांना वाघाच्या पावलांच्या खुणा शोधत आहो असे उत्तर देऊन वेळकाढू धोरण ठेऊन वेळ मारून नेली.

परंतु, सोमवारी (ता.१८) सायंकाळी ७ च्या दरम्यान सुखदेव शिंदे हे आपल्या शेतात गव्हाच्या पिकाची जागल करण्याकरिता गेले असता, अचानक बिबट्याने हल्ला चढवला व डोक्याला चावा घेतला. मानेला व दंडावर पंजाने झडप मारून जखमी केले.

हेही वाचा - राज्य शासनाच्या आदेशाने महानगरपालिकेतील तीन वर्षातील ठराव गोळा करण्याची लगबग सुरू

सोबत जगलीकरिता असलेला कुत्रा असल्याने त्या इसमाचा जीव वाचला परंतु, आपल्या मालकाचा जीव वाचविण्यात आपला जीव गमवावा लागला. याला जबाबदार कोण वन विभागाने दखल घेतली असती तर, जीव आणि हल्ला झाला नसता. सदर इसमास मानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे भरती करण्यात आले.

हेही वाचा - अकोला जिल्हा बँकेसाठी २० फेब्रुवारीला मतदान, सहकार क्षेत्रातील राजकीय घडामोडींना वेग

ही घटना घडताच शेकापचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत राठोड यांनी वनविभागाला निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केली.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image