esakal | सावधान; पतंग उडवित  असताना अपघात टाळायचा असेल तर या गोष्टींपासून रहा दूर
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News- Beware of power system while flying kites!

मकरसक्रांतीनिमित्य पतंगोत्सव साजरा करताना उच्च व लघु दाबाच्या विजवाहिन्या, फिडर व वीज यंत्रणापासून सावधगिरी बाळगावी व विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळावे, असे आवाहन महावितरण अकोला परिमंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.

सावधान; पतंग उडवित  असताना अपघात टाळायचा असेल तर या गोष्टींपासून रहा दूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : मकरसक्रांतीनिमित्य पतंगोत्सव साजरा करताना उच्च व लघु दाबाच्या विजवाहिन्या, फिडर व वीज यंत्रणापासून सावधगिरी बाळगावी व विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळावे, असे आवाहन महावितरण अकोला परिमंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.


अवघ्या काही दिवसांवर आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीचे दुकाने सर्वत्र थाटली असून, दिवसेंदिवस आकाशातही रंगीबिरंगी पतंगांची गर्दी वाढत आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येवू नये याकरिता महावितरणने सर्व संक्रांतप्रेमींना पतंग उडवितांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत आहे.

हेही वाचा - आधारच अपडेट नाही तर कशी मिळणार कर्जमुक्ती, अजून चार हजार शेतकऱ्यांचे आधार अपडेशन बाकी

शहरी तसेच ग्रामीण भागात वीज वितरणच्या लघु व उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले असते. अनेकदा पतंग उडवितांना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकतात. अशावेळी ते अडकलेले पतंग काठ्या, लोखंडी सळखी, किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करतात.

अश्यावेळी अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होवून जीवावर बेतू शकते त्यामुळे असे प्रयत्न करू नये. अनेकदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो. हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात विजेचा भीषण अपघात होऊ शकतो. मांजा ओढताना एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होवून शॉर्टसर्किटमुळे प्राणांकीत अपघात होवू शकतो.

हेही वाचा - जिल्हा परिषदेची बियाणे वितरण योजनेत पाच हजार शेतकरी लाभापासून वंचितच!

प्रामुख्याने शहरासह ग्रामीण भागातही वीज यंत्रणा अस्तिवात आहेत. वीज वाहिन्यांच्या परीसरात नागरिक आणि लहान मुले पतंग उडवितात. अनेक पतंग या विजवाहिन्यामध्ये किंवा इतर यंत्रणेत अडकतात व यावेळी पतंग काढताना अनेकवेळा अपघात घडतात.

नागरिक व लहान मुलांनी वीज वाहिन्या,वीज यंत्रणा असलेल्या परिसराएवजी सुरक्षित आणि मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा. पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे. वीजप्रवाह असलेल्या यंत्रणेपासून दूर राहूनच पतंगोत्सव साजरा करावा. अपघाताच्या दुदैर्वी घटना टाळण्यासाठी सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.

हेही वाचा - ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’, कान्हेरीच्या विठ्ठलाने शेतीलाच केले ‘पंढरी’​

धातूमिश्रीत मांजा धोकादायक
बाजारामध्ये धातुमिश्रित मांजा मिळतो या मांजावर धातुमिश्रित रसायनाचे कोटिंग केलेले असल्यामुळे त्यातून वीज प्रवाह संचार करू शकतो. असा मांजा विद्युत तारेला अडकताच विद्युत यंत्रणेमध्ये विघाड होऊन संबंधित भागातील वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. तसेच या मांजामुळे अपघाताची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image