प्रचार तोफा थंडावल्या, आता छुपा प्रचार!,जिल्ह्यात ४.६३ लाख मतदार उद्या निवडणार गावकारभारी

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 14 January 2021

निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार विविध क्लृप्त्या लढवत आहेत. प्रत्यक्ष प्रचाराला बुधवारी (ता. १३) सायंकाळनंतर पूर्ण विराम मिळाला. त्यामुळे आता छुप्या मार्गाने प्रचार करण्यावर उमेदवारांचा भर राहणार आहे.

अकोला : निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार विविध क्लृप्त्या लढवत आहेत. प्रत्यक्ष प्रचाराला बुधवारी (ता. १३) सायंकाळनंतर पूर्ण विराम मिळाला. त्यामुळे आता छुप्या मार्गाने प्रचार करण्यावर उमेदवारांचा भर राहणार आहे.

दोन रात्री व गुरुवारचा दिवस उमेदवारांसाठी महत्त्वाचा राहणार आहे. उमेदवारांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारावर जोर देत आपले पॅनल निवडून आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. आता उमेदवार प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर देत आहेत.

जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्ह्यातील १० ग्रामपंचायत यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता २१४ ग्रामपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया १५ जानेवारी रोजी पार पडेल.

हेही वाचा - खासदारांच्या गावात स्वाभिमानीच्या शिट्ट्यांनी बसल्या शिवसेनेच्या कानठळ्या

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार अकोला जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मदतान होणार होते. त्यापैकी व्याळा ग्रामपंचायतची निवडणूक स्थगित झाली आहे

तर १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे २१४ ग्रामपंचायतीसाठीच शुक्रवारी मतदान होईल. त्यात संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ४ लाख ६३ हजार २४७ मतदार मतदानाचा हक्का बजावणार आहेत. या मतदारांमध्ये २ लाख ४० हजार ९६९ पुरूष व २ लाख २२ हजार २७० महिला मतदारांचा समावेश आहे.

हेही वाचा -  अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

तीन इतर मतदरांचा समावेश
२१४ ग्रामपंचायतींसाठी ४ लाख ६३ हजार २४७ मतदार करतील. त्यामध्ये ८ इतर मतदारांचा (तृतीय पंथी) सुद्धा समावेश आहे. सदर मतदार तेल्हारा, अकोला व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक तर अकोट तालुक्यातील पाच मतदार आहेत.

१ हजार ७४१ सदस्यांसाठी निवडणूक
जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया शुक्रवारी (ता. १५) पार पडेल. यावेळी १ हजार ७४१ सदस्य पदांच्या निवडीसाठी मतदार मतदान करतील. या व्यतिरीक्त उमेदवारी अर्जातील त्रुटीमुळे उमेदवारांचा अर्ज बाद होणे किंवा उमेदवारी अर्जच न दाखल झाल्याने जिल्ह्यातील ९ प्रभागातील सदस्यांचे पदं रिक्तच राहणार आहेत. त्यामध्ये तेल्हारा, अकोट, बाळापूर तालुक्यातील प्रत्येक दोन-दोन तर अकोला तालुक्यातील तीन प्रभागांचा समावेश आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीचे 25 कोटी रुपये! निधी तहसीलदारांच्या खात्यात जमा

अशी आहे मतदार संख्या
तालुका ग्रा.पं. बिनविरोध जागा उमेदवार पुरूष स्त्री एकूण
तेल्हारा ३२ २ २३५ ५६९ ३८०९७ ३३५९९ ७१६९७
अकोट ३५ ३ २७८ ६६८ ३३४१३ ३०५१५ ६३९३३
मूर्तिजापूर २७ २ २१४ ५३४ २५३९८ २३९५३ ४९३५१
अकोला ३६ ० ३३५ ९०५ ५१९२३ ४८३४९ १००२७३
बाळापूर ३५ २ २९२ ७५९ ४२४८२ ३९२७० ८१७५२
बार्शीटाकळी २६ १ १९९ ५०३ २३९५१ २३१६८ ४७१२०
पातूर २३ ० १८८ ४७३ २५७०५ २३४१६ ४९१२१
एकूण २१४ १० १७४१ ४४११ २४०९६९ २२२२७० ४६३२४७

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi news-campaign stopped, now hidden propaganda !, 4.63 lakh voters in the district will elect village head tomorrow