esakal | शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीचे 25 कोटी रुपये! निधी तहसीलदारांच्या खात्यात जमा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News- Farmers will get Rs 25 crore for excess rainfall! Funds credited to Tehsildar's account

 जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने दुसऱ्या व अंतिम हप्त्याचे २५ कोटी ७८ लाख ७२ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. सदर निधीचे विभाजन करून निधी तहसीलदारांच्या निधी खात्यात वळती करण्यात आला आहे. त्यामुळे मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीचे 25 कोटी रुपये! निधी तहसीलदारांच्या खात्यात जमा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने दुसऱ्या व अंतिम हप्त्याचे २५ कोटी ७८ लाख ७२ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. सदर निधीचे विभाजन करून निधी तहसीलदारांच्या निधी खात्यात वळती करण्यात आला आहे. त्यामुळे मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळण्याची शक्यता आहे.

यावर्षी झालेल्या सततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या मूग व उडीद पिकांचे नुकसान झाले. सोयाबीनसह, तूर, कपाशीला सुद्धा अति पावसाचा फटका बसला. अतिवृष्टीमुळे कपाशीचे बोंड काळे पडले.

हेही वाचा - आधारच अपडेट नाही तर कशी मिळणार कर्जमुक्ती, अजून चार हजार शेतकऱ्यांचे आधार अपडेशन बाकी

झाडांची पडझड, बगीचातील फळ गळून पडल्याने बागायती शेतीचे सुद्धा चांगलेच नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले होते. परिणामी जिल्ह्यातील नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आल्यानंतर शासनाकडे मदतीची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान मदत निधीच्या दुसऱ्या हप्त्याचे २५ कोटी ७८ लाख ७२ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला मिळाले आहेत. त्याचे विभाजन करुन निधी तहसीदारांच्या खात्यात वळती करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणाच्या मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा - जिल्हा परिषदेची बियाणे वितरण योजनेत पाच हजार शेतकरी लाभापासून वंचितच!


यापूर्वी मिळाले होते २७ कोटी
अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाला पहिल्या हप्त्याचे २६ कोटी ९४ लाख ३९ हजार रुपये दिले होते. सदर निधीचे विभाजन करुन तो तहसीलदारांच्या खात्यात वळती करण्यात आल्यानंतर ३८ हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्यात आली. त्यानंतर सुद्धा अनेक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान आता दुसऱ्या व अंतिम टप्प्याचा निधी मिळाल्याने शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा - ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’, कान्हेरीच्या विठ्ठलाने शेतीलाच केले ‘पंढरी’​
 
असा आहे विभाजीत करण्यात आलेला निधी

  • तालुका वितरीत निधी
  • अकोला ५ कोटी ६६ लाख ३ हजार
  • बार्शीटाकळी १ कोटी ४२ लाख ९५ हजार
  • अकोट ५ कोटी १८ लाख २२ हजार
  • तेल्हारा ३ कोटी १८ लाख ७ हजार
  • बाळापूर ६ कोटी २९ लाख ६९ हजार
  • पातूर १ कोटी ६० लाख ३५ हजार
  • मूर्तिजापूर २ कोटी ४३ लाख ४१ हजार
  • एकूण २५ कोटी ७८ लाख ७२ हजार

(संपादन - विवेक मेतकर)

loading image