esakal | ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार विसरले रक्ताचे नाते; वडिलांचे मुलीला तर काकाचे काकूला चॅलेंज
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Candidates in Gram Panchayat elections forgot blood relationship; Challenge the father's daughter and the uncle's aunt

माणसाच्या जन्मासोबत त्याला काही नाती मिळतात.जन्मल्यानंतर तो काही नाती जोडतो. परंतू तरीसुद्धा आपली  नाती खरी नाहीत असं वाटू लागतं.

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार विसरले रक्ताचे नाते; वडिलांचे मुलीला तर काकाचे काकूला चॅलेंज

sakal_logo
By
श्रीकृष्ण फुकट

आगर (जि.अकोला) : माणसाच्या जन्मासोबत त्याला काही नाती मिळतात.जन्मल्यानंतर तो काही नाती जोडतो. परंतू तरीसुद्धा आपली  नाती खरी नाहीत असं वाटू लागतं.

आपली आजची नाती म्हणजे एकमेकांच्या वापरण्याची, हवं तसं,हवं तेव्हा ओरबाडण्याची गोष्ट झालीयं. आणि तरीसुद्धा माणूस आपल्या नात्यांमधे खुप सारं प्रेम आहे असंही दाखवत राहतो

जन्मापासून मरेपर्यंत माणूस कुठल्याही एका नात्यात सुखी,शांत जगला असं होत नाही. त्यातही पुन्हा कितीतरी रुसवे, फुगवे आणि कधी कधी स्वार्थीपणा असतोचयं. प्रसंगी नात्यातली माणसंच एकमेकांना गरजेच्यावेळी नडायला पाहतात. आता हेच पहा ना!

पाच हजार लोकसंख्या असणाऱ्या आगर ग्रामपंचायतची निवडणूक यावर्षी नातेसंबांधित उमेदवारांच्या एकमेकांविरुद्धच्या लढतीने गाजl आहे. येथे चार वार्डातील अकरा जागांसाठी तब्बल ३६ उमेदवार रिंगणात आहे.

हेही वाचा - कशी नशिबानं थट्टा आज मांडली!, स्मशानभूमीचा रस्ता अडविल्याने अंत्ययात्रा थांबली, अंत्यसंस्कारासाठी चार तासापासून प्रेत रस्त्यावर


आगर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक एकमधून सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

यामध्ये वडील-मुलगी, सून, काका-काकू, वडील, नातसून यांच्यामध्ये परस्पर निवडणुकीची लढत होणार आहे. एकाच वार्डात वरील एकाच कुटुंबातील नाते संबंध असलेले सर्व उमेदवार वेगवेगळ्या पॅनलकडून रिंगणात असल्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत वाढली आहे. मात्र नातेसंबांधातील उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे असल्याने या वॉर्डातील मतदार संभ्रमात पडले आहेत. मतदान कोणाला करावे काका, सून, काकू, मुलगी की वडीलांना हा प्रश्न मतदारांना पडला आहे.

हेही वाचा - शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा!, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री

जुन्यांना खो, तरूण मैदानात
अकरा सभासद असणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये एकूण ३६ उमेदवार रिंगणात आहे. या पंचवार्षिक योजनेमध्ये होणारी ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करावी व शांततेत पार पडावी यासाठी गावातील अनेक जुन्या राजकीय नेत्यांनी दोन महिने अगोदर विविध सभा घेऊन धडपड केली. परंतु नवतरूण उमेदवारांनी या वयोवृद्ध जुन्या राजकीय नेत्यांना तुम्ही निवडणुकीतून संन्यास घ्यावा व नवतरुणांना निवडणुकीत संधी द्यावी यासाठी चारही वार्डातील जुन्या राजकीय नेत्यांना निरोप देत तरुण उमेदवारांनी रिंगणात उडी घेतली. चारही वार्डात विविध पॅनल. आगरमध्ये ३६ उमेदवारांपैकी तीन उमेदवार हे अपक्ष असून, इतर उमेदवार पॅनलतर्फे लढत देत आहे.

हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच

सर्वाधिक उमेदवार फुकट?
वार्ड क्रमांक एकमध्ये एकाच कुटुंबातील सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहे. या उमेदारांचे आडनाव फुकट असल्याने कोणत्या फुकट उमेदवाराला त्याचा फायदा होतो व कोणाला तोटा याकडे इतरत्र उमेदवारांचे लक्ष लागले आहे. उमेदवाराचे नाव जरी फुकट असले तरी मतदारांना मात्र चहापाणी नाश्ता करण्याची सोय उमेदवारांनी केली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top