कशी नशिबानं थट्टा आज मांडली!, स्मशानभूमीचा रस्ता अडविल्याने अंत्ययात्रा थांबली, अंत्यसंस्कारासाठी चार तासापासून प्रेत रस्त्यावर

मुशीरखान कोटकर
Friday, 8 January 2021

अनेक वर्षांपासून खाजगी शेतात असलेल्या स्मशानभूमी चा रस्ता बंद करून अंत्यसंस्कार रोखून धरण्याचा प्रकार सिंदखेड राजा तालुक्यातील चिंचोली जहागीर येथे आज (ता.८) घडला चार तास अंतयात्रा ताटकळत राहिल्याने मृतकाच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागला असून या प्रकाराने प्रशासनात खळबळ उडाली दरम्यान प्रशासनाच्या मध्यस्थीने पर्यायी जागेवर अंत्यसंस्कार पार पडले

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा)  जीवन अनिश्चित आहे, पण मृत्यू अटळ आहे. खरं तर मृत्यू हा जीवनाचा अंत नव्हे. वस्तुत: मृत्यू हा जीवनाचा आरंभ आहे.

मात्र, अनेक वर्षांपासून खाजगी शेतात असलेल्या स्मशानभूमी चा रस्ता बंद करून अंत्यसंस्कार रोखून धरण्याचा प्रकार सिंदखेड राजा तालुक्यातील चिंचोली जहागीर येथे आज (ता.८) घडला चार तास अंतयात्रा ताटकळत राहिल्याने मृतकाच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागला असून या प्रकाराने प्रशासनात खळबळ उडाली.  

हेही वाचा - शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा!, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री

सिंदखेड राजा तालुक्यातील चिंचोली जहागीर येथील शिवाजी नागरे (वय ४२) यांचे काल अपघाती निधन झाले त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घरापासून अंत्ययात्रा निघाली अनेक वर्षापासून गावातील प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यात येत असलेल्या स्मशानभूमी नजीक अंतयात्रा पोहोचली त्यावेळी जागेचे मालक रामेश्वर काकड यांनी माझ्या मालकीच्या जागेवर यापुढे अंत्यसंस्कार करू देणार नाही असे म्हणून अंतयात्रा अडवली.

हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच

या प्रकाराने थोडावेळ गोंधळ उडाला रस्त्यावरच प्रेत ठेवून अंत्ययात्रेत सहभागी नातेवाईक आप्तेष्ट यांनी रस्त्यावरच ठाण मांडले सदर प्रकाराची माहिती प्रशासनाला कळताच तहसीलदार श्री सावंत यांनी मंडळ अधिकारी राम बोंद्रे व महसूल कर्मचारी यांना घटनास्थळी हजर होऊन माहिती घेण्याचे निर्देश दिले सिंदखेड राजा चे ठाणेदार जयवंत सातव यांच्यासह पोलिस प्रशासन चिंचोली गावात दाखल झाले.

हेही वाचा - आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’

यावेळी महसूल विभागाने अंत्यसंस्कार होत असलेल्या खाजगी जागेच्या कागदपत्रांची पाहणी केली असता त्या जागेवर स्मशानभूमी म्हणून कुठलीच नोंद नसल्याचे निदर्शनास आले दरम्यान जागेचे मालक हे पूर्वी बीड येथे राहत होते त्यांच्या शेतात पूर्वीपासून अंत्यसंस्कार केले जात असताना त्यांनी कधीही अडविले नाही.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

Image may contain: one or more people, people sitting, outdoor and nature

अलीकडील काळात त्यांनी शेतात घर बांधले व तेथे त्यांचे कुटुंब राहायला आल्याने त्यांनी आज अंतयात्रा अडविली दरम्यान चिंचोली जहागीर येथे स्मशानभूमीच्या वादावरून चार तास प्रेत यात्रा रस्त्यावर थांबविण्यात आली होती ठाणेदार श्री सातव मंडळ अधिकारी श्री बोंद्रे यांच्यासह गावातील मध्यस्थीने प्रतिष्ठित व्यक्तींनी तोडगा काढून पर्यायी सार्वजनिक जागेवर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले चार तासानंतर मृतक शिवाजी नागरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana Marathi News Cemetery road blocked, funeral procession stopped, corpse on the road for four hours for cremation