धोका कायम; कोरोना संसर्गाचे आणखी 31 रुग्ण वाढले

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 21 January 2021

 कोरोना विषाणू कोविड-१९ चा संसर्ग झालेल्या ३१ नवीन रुग्णांची भर जिल्ह्यात पडली आहे. बुधवारी प्राप्त ४१३ अहवालांपैकी सकाळी ३१ अहवाल पॉझिटिव्ह आलेत. सायंकाळी मात्र अहवाल प्राप्त झाले नाहीत. सध्या जिल्ह्यात ६३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अकोला : कोरोना विषाणू कोविड-१९ चा संसर्ग झालेल्या ३१ नवीन रुग्णांची भर जिल्ह्यात पडली आहे. बुधवारी प्राप्त ४१३ अहवालांपैकी सकाळी ३१ अहवाल पॉझिटिव्ह आलेत. सायंकाळी मात्र अहवाल प्राप्त झाले नाहीत. सध्या जिल्ह्यात ६३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून बुधवारी सकाळी ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व २२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील रामनगर येथील सात, मलकापूर, रणपिसे नगर व केशवनगर येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड, गोरक्षण रोड, गणेशनगर येथील प्रत्येकी दोन, उर्वरित देवगाव (ता. पातूर), उत्तम प्लॉट, बिसेन लेआऊट, रतनलाल प्लॉट, न्यू तापडीयानगर, केळीवेळी (ता. अकोट), मोहम्मद अली चौक, कौलखेड येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.

हेही वाचा - अवघे गाव रडले, मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही सोडले प्राण; मकरसंक्रांतीलाच गावावर शोककळा

दरम्यान, मंगळवारी रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११ हजार २३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी ३२९ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १० हजार ३०० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

हेही वाचा - आता सरपंच होणार कोण, कसे असेल ग्रामपंचायतचे आरक्षण?

२७ जणांना डिस्चार्ज
बुधवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून नऊ, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, तर होम आयसोलेशन येथून १० अशा एकूण २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Danger remains; Another 31 patients with corona infection grew