
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मावळते अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांच्यासह ७ संचालक अविरोध निवडून आले आहे.
अकोला : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मावळते अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांच्यासह ७ संचालक अविरोध निवडून आले आहे.
त्यामध्ये सुभाष ठाकरे मंगरुळपीर, आ. अमित झनक रिसोड, सुहास तिडके मूर्तिजापूर, राजेश राऊत बाळापूर, जगदीश पाचपोर पातूर तालुका स्तरीय सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून अविरोध निवडून आले आहेत. यांचे एक-एक अर्ज असल्यामुळे व छाननीत वैध ठरल्यामुळे ते अविरोध निवडून आले आहेत.
हेही वाचा - बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप
औद्योगिक व मजुरांच्या सहकारी संस्था मतदारसंघातून मावळते उपाध्यक्ष वामनराव देशमुख हेही अविरोध निवडून आले आहेत.
इतर मागासवर्गीय मतदार संघातून बॅंकेचे विद्यमान संचालक डॉ. सुभाषचंद्र कोरपे, बाळापूर येथील सेवकराम ताथोड व रमेश ठाकरे रिंगणात आहेत. विमुक्त जाती व भटक्या मतदार संघात रामसिंग जाधव व मधुकर पवार रिंगणात आहेत.
हेही वाचा - 44 कोटींच पाणी थकलंय! देखभालीवर होतोय लाखोंचा खर्च
महिला प्रतिनिधी मतदार संघात मंदा चौधरी मालेगाव, सुमन ठाकरे बाळापूर, छायाताई देशमुख वाशीम यांचे अर्ज कायम राहले आहेत. खरेदी विक्री व प्रक्रिया मतदार संघात शिरीष धोत्रे अकोला, सेवकराम ताथोड बाळापूर व चंद्रकांत ठाकरे मंगरुळपीर यांचे अर्ज वैध ठरले आहेत.
हेही वाचा - Union Budget 2021: अर्थसंकल्पात सरकारला करावी लागेल उधळपट्टी
ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मतदार संघात हिदायत पटेल, बाळकृष्ण काळे, रामकृष्ण बाहेती व वाशीम येथील वामनराव देशमुख यांचे अर्ज कायम आहेत.
क्लिक करा - अकोला जिल्ह्यातील बातम्या
इतर मागासवर्गीय मतदार संघात विनोद मंगळे, रविंद्र बिहाडे, गोकर्णा भोयर तर, महिला राखीवमध्ये भारती गावंडे, माया म्हैसने, आशा पवार, कमला राऊत, अर्चना बाबर, छाया पोले, गोकर्णा भोयर, मालू महल्ले यांचे अर्ज छाननीत नामंजूर करण्यात आले.
(संपादन - विवेक मेतकर)