esakal | अरेरे हे काय! ऐन हंगामात पिकांमध्ये शेतकऱ्याने घातली गुरे, काय घडले असे....
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Farmers took cattle in their crops during the season

भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते, परंतु मागील काही दिवसांपासून भाजीपाल्या सह पत्ता कोबी व फूलकोबी यांचे भाव कमालीचे घसरले आहेत. पत्ता कोबी ला ३०० ते ४०० रूपये प्रति क्विंटल, तर फूलकोबी ला ७०० ते ८०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्यामुळे काढणी व वाहतुकीचा खर्चही निघत नसल्यामुळे, कोबी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

अरेरे हे काय! ऐन हंगामात पिकांमध्ये शेतकऱ्याने घातली गुरे, काय घडले असे....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

रिसोड (जि.वाशीम) :  बाजारात भाजीपाला व कोबीचे भाव गडगडल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पत्ता कोबी ला ३०० ते ४०० रूपये प्रति क्विंटल, तर फुलकोबी ला ७०० ते ८०० रूपये क्विंटल भाव मिळत असल्यामुळे केवळ काढणीचा खर्चही वसूल होत नसल्यामुळे संतापलेल्या भाजीपाला उत्पादक शेतकरी संजय ईरतकर यांनी आपल्या दोन ऐकरातील उभ्या कोबीच्या शेतात गुरे चरायला सोडली आहेत.


रिसोड तालुक्यात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते, परंतु मागील काही दिवसांपासून भाजीपाल्या सह पत्ता कोबी व फूलकोबी यांचे भाव कमालीचे घसरले आहेत. पत्ता कोबी ला ३०० ते ४०० रूपये प्रति क्विंटल, तर फूलकोबी ला ७०० ते ८०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्यामुळे काढणी व वाहतुकीचा खर्चही निघत नसल्यामुळे, कोबी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

हेही वाचा - राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

एक रुपयाला एक रोप याप्रमाणे रोप विकत घ्यावे लागते. कसेही केल्याने तीस हजार रोपे लागतात. खते, फवारणी, मजुरी असा एकरी ५० ते ५५ हजार रुपये खर्च येतो. लागवड खर्च, तर सोडाच परंतु, कोबी तोडून बाजारात वाहतूक करण्याचा खर्चही निघत नसल्यामुळे येथील शेतकरी ईरतकर यांनी उभ्या कोबीच्या पीकात गुरे सोडली आहेत.

हेही वाचा - जिल्हा बँक निवडणुक; मतदार अज्ञातस्थळी; उमेदवारीचा गुंता कायम

यावर्षी मागील काही दिवसांपासून भाजीपाल्याचे भाव कमालीचे घसरले आहेत. याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नेमक्या कोणत्या भाजीपाल्याची लागवड करावी असा प्रश्‍न भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.

हेही वाचा - बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

दोन एकर पत्ता कोबी ची लागवड केली होती. एक रुपयाला एक रोप याप्रमाणे दोन एकर मध्ये साठ हजार रुपयांचे रोपे लावले. खत फवारणी व मशागत असा एकूण दोन एकरामध्ये ९० हजार रूपयांपर्यंत खर्च आला. कोबी विकून काढणी व वाहतुकीचा खर्चही निघत नाही.
-संजय ईरतकर, भाजीपाला उत्पादक शेतकरी, रिसोड.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर