पहिल्या टप्प्यात सात हजार फ्रंटलाईन वर्करला मिळणार कोरोनाची लस!

Akola Marathi News In the first phase, 7,000 frontline workers will get corona vaccine!
Akola Marathi News In the first phase, 7,000 frontline workers will get corona vaccine!

अकोला : गत ८-९ महिन्यांपासून संपूर्ण जिल्ह्यात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोना बाधिकांना कोरोनामुक्त करण्यासाठी डॉक्टर व आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत असतानाच कोरोना लसीकरणाची तयारी सुद्धा करण्यात येत आहे.

कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६ हजार ९३८ कोरोना योद्ध्यांना (फ्रंटलाईन वर्कर) कोरोनाची मोफत लस देण्यात येणार आहे. त्यासाठीचे प्राथमिक नियोजन आरोग्य विभागाने केले असून वरिष्ठ स्तरावरुन आदेश मिळताच जिल्ह्यात ‘ड्राय रन’ सुद्धा राबविण्यात येईल.

हेही वाचा -  उद्‍ध्वस्त खरीपावर सरकारी माेहाेर; शेतकऱ्यांना मिळणार सवलती

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाने जिल्ह्यात मार्च, एप्रिल महिन्यापासून धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीच्या काळात महानगरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा नंतर गाव-खेड्यात सुद्धा प्रादुर्भाव वाढला. सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येने उच्चांकी गाठली होती. या महिन्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन हजारावर पोहचली होती.

मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा ६० वर जावून पोहचली होती. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा जिल्ह्यात गुणाकार सुरू असल्याचे दिसून आले होते. परंतु ऑक्टोबर महिन्यात मात्र कोरोनाग्रस्तांच्या संख्या सतत कमी होत असल्याचे दिसून आले. दरम्यान आता कोरोनाचा वेग स्थिर असला तरी धोका कायम आहे. परंतु नववर्षात नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्याच्या हालचाली वाढल्या असल्याने आरोग्य विभागाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६ हजार ९३८ कोरोना योद्ध्यांना लस देण्यात येणार आहे.

हेही वाचा -  अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

असे असेल लसीकरण
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात येईल. शहरी भागात खासगी रुग्णालयातील १ हजार २३९ कोरोना योद्ध्यांना लस देण्यात येईल, तर सरकारी रुग्णालयातील ६०१ रुग्णांवर लस देण्यात येईल. ग्रामीण क्षेत्रातील सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या ४ हजार ८२५ व खासगी रुग्णालयांमध्ये कार्यरत २७३ फ्रंटलाईन वर्कर (कोरोना योद्धा) यांना लस देण्यात येईल. कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील ५ हजार ९८ कोरोना योद्ध्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येईल. त्यासोबत शहरी भागातील १ हजार ८४० कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येईल.

अशी आहे पहिल्या टप्प्याची तयारी
- खासगी क्षेत्रातील कोरोना योद्धे - १ हजार ५१०
- सरकारी क्षेत्रातील कोरोना योद्धे - ५ हजार ४२८
- केंद्राच्या योजनेनुसार अंगणवाडी सेविका, आशा, एमपीडब्ल्यू, एएनएम व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे प्रथम लसीकरण करण्यात येईल. त्यानंतर, आरोग्य कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलिस, वाहतूक कर्मचारी अशा क्रमाने ही लस दिली जाईल.

हेही वाचा -  उद्‍ध्वस्त खरीपावर सरकारी माेहाेर; शेतकऱ्यांना मिळणार सवलती

‘को-विन’मध्ये नोंद
लसीकरणाच्या पूर्वतयारी अंतर्गत जिल्ह्यातील ज्या कोरोना योद्ध्यांना लस देण्यात येणार आहे. त्यांची नोंद को-विन ॲपमध्ये करण्यात आली आहे. संबंधितांचे नाव, पत्ता व इतर माहिती त्यामध्ये नमूद करण्यात आली आहे.

शासनाच्या आदेशाने जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची प्राथमिक तयारी करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ६ हजार ९३८ फ्रंटलाईन वर्कर यांचे लसीकरण करण्यात येईल. लसीकरण करण्यात येणाऱ्यांची को-विन ॲप व पोर्सलवर नोंद करण्यात आली आहे.
- डॉ. सुरेश आसोले,जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प., अकोला

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com