
नागरीक व विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व बिंबविण्यासाठी केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सुचनेनुसार फिट इंडीया मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीबाबत चाचणी होणे आवश्यक असुन, त्यासाठी दि.10 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
बुलडाणा : नागरीक व विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व बिंबविण्यासाठी केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सुचनेनुसार फिट इंडीया मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीबाबत चाचणी होणे आवश्यक असुन, त्यासाठी दि.10 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
यापुढे मुदत वाढवुन देण्यात येणार नाही. त्यामुळे दि.10 जानेवारी 2021 पर्यंत शाळांनी नोंदणी न केल्यास त्यासाठी शाळा जबाबदार राहील असा इशारा जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी दिला आहे.
हेही वाचा - ‘आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’
राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांतुन पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची तंदुरुस्तीबाबत चाचणी घेऊन शाळांनी त्याबाबत फिट इंडीया पोर्टल किंवा पवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यााबबत पच्या माध्यमातुन प्रशिक्षण घेतले जाणार नाही आहे. यासाठी संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. यासाठी लॅपटॉप किंवा डेक्सटॉपचा वापर करावा.
तसेच खेलो इंडीयाच्या पवर इयत्ता 1 ली ते 12 वी च्या सर्व शाळांमधील शारीरिक शिक्षण विषयाच्या एका शिक्षकांनी नोंदणी करावयाची आहे, शाळेत शारीरिक शिक्षक उपलब्ध नसल्यास सबंधित प्राचार्यांनी/मुख्याध्यापक यांनी या कामासाठी एका सहा. शिक्षकाची नियुक्ती करावी.
हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
शाळा जर एक शिक्षकी असेल तर त्याच शिक्षकाने आपली नोंदणी करावी. नियुक्त शिक्षकाने फोनवर लिंकचा वापर करावा. विद्यार्थ्यांची क्रीडा विषयक प्रशिक्षणे पच्या माध्यमातुन होणार असल्याने नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणी न झाल्यास संबंधीत संस्था / शाळा व मुख्याध्यापक जबाबदार राहतील असा इशारा श्री.संजय सबनीस जिल्हा क्रीडा अधिकारी, सचिन जगताप शिक्षणाधिकारी (प्राथमिक), प्रकाश मुकुंद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी दिला आहे.
हेही वाचा - औरंगाबादचं नामांतर: ठाकरे यांचा शिवसेनेसह मित्रपक्षांना टोला
नोंदणीची प्रक्रीया दि.10 जानेवारी 2021 पर्यंत पुर्ण करावी. नोंदणी करतांना सर्व जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, आय टी शिक्षकांनी यासाठी पुढाकार घेऊन शाळा व शिक्षक नोंदणीसाठी शाळांना सहकार्य करावे. यापुर्वी शाळांची नोंदणी केली असल्यास पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. अशा सुचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्राचे संचालक राहुल व्दिवेदी यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शाळा/महाविद्यालय यांनी दि.10 जानेवारी 2021 पुर्वी नोंदणी कार्यक्रम राबवुन शासनाचा हा उपक्रम यशस्वीरित्या राबवावा असे आवाहन मा.श्री.प्रकाश मुकुंद शिक्षणाधिकारी (माध्य.) व श्री.सचिन जगताप शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प.बुलडाणा व मा.श्री.संजय सबनीस जिल्हा क्रीडा अधिकारी बुलडाणा हे करतात.
(संपादन - विवेक मेतकर)