esakal | प्राण्यांच्या झुंजीवर खेळला जात होता जुगार
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Gambling was being played on animals

दहशतवाद विरोधी पथकाला रविवारी दमानी हॉस्पिटल जवळील मोकळ्या जागेत एडक्याची झुंज लावली जात असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी पथकाने कारवाई केली असता एडक्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळविला जात असल्याचे आढळून आले.

प्राण्यांच्या झुंजीवर खेळला जात होता जुगार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला :  प्राण्यांच्या झुंजीवर अकोला शहरातील आपातापा रोडवर दमानी हॉस्पिटल जवळ जुगार खेळाला जात होता. याप्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. झुंजीसाठी आणलेले सहा एकडेही जप्त करण्यात आले.


दहशतवाद विरोधी पथकाला रविवारी दमानी हॉस्पिटल जवळील मोकळ्या जागेत एडक्याची झुंज लावली जात असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी पथकाने कारवाई केली असता एडक्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळविला जात असल्याचे आढळून आले.

हेही वाचा - गुपचूप हलवले जात होते शासकीय कार्यालय, भाजप, प्रहारचे कार्यकर्त्यांनी वाचा काय केले

सार्वजनिक ठिकाणी मोकळ्या जागेत आठ ते १० इसम त्यांनी पाळलेले एडके बांधून ठेवून आपसात त्यांची टक्कर खेळवित होते. त्यावर पैशानची बाजी लावत होत होते. येथे एकूण सहा एकडे याठिकाणी जप्त करम्यात आले. याशिवाय झुंजी लावून जुगार खेळणाऱ्यांना आठ इसमांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळून ८५३० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. चार मोबाइल, खुर्च्या, टेबल, मंडप व इतर साहित्यासह एकूण एक लाख ९६ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करम्यात आला.

हेही वाचा - भाजपचे आमदार अनुपस्थित असल्याने शिवसेनेने केला ‘गेम’

प्राणी क्लेश कायद्यांतर्गत कारवाई
प्राण्याची झुंज लावून त्यांना निर्दयीपणे वागणूक देणाऱ्या आरोपी विरुद्ध जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देण्यासाठी प्राणी क्लेश कायद्यामंतर्गही अकोट फैल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - आरक्षण निघाले; उमेदवारच नाही! आता काय करणार?

या आरोपींना केली अटक
एडक्यांची झुंज लावल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कालू महबूब गोरवे, मोहम्मद हारिश अब्दुल राशिद, मोहम्मद फिरोज हाजी शब्बीर (रा. गवळीपुरा), जय कनोजिया, चंपालाल कनोजिया, धीरज सुरेश कैथवास, राकेश मुन्ना बिचेले (रा बापूनगर), सलीम भिका गोरवे (रा नायगाव) आदी आरोपींचा समावेश आहे.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

(संपादन - विवेक मेतकर)

loading image