esakal | गुपचूप हलवले जात होते शासकीय कार्यालय, भाजप, प्रहारचे कार्यकर्त्यांनी वाचा काय केले
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Political News BJP and Prahar thwarted the move of Livestock Development Board

भाजपने स्थलांतराचा निषेध करीत कार्यालयाच्या गेटला कुलूप ठोकले तर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आग्रमक होत आदर्श कॉलनीतील एका अधिकाऱ्याच्या घरापुढे थांबलेल्या ट्रकमधील साहित्य काढून नेत पुन्हा कार्यालयात नेऊन ठेवले. 

गुपचूप हलवले जात होते शासकीय कार्यालय, भाजप, प्रहारचे कार्यकर्त्यांनी वाचा काय केले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला  : महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूरला स्थलांतरीत करण्याचा आदेश निघाल्यानंतर दोन दिवसांत कार्यालयातील साहित्या नागपूरला हलविण्याची घाई अधिकाऱ्यांना झाली होती. रविवारी सुटी असतानाही गुपचूप कार्यलायातील साहित्य ट्रकमध्ये भरून घेवून जात असल्याची माहिती भाजप व प्रहारच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी कार्यालयावर हल्लाबोल केला.

भाजपने स्थलांतराचा निषेध करीत कार्यालयाच्या गेटला कुलूप ठोकले तर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आग्रमक होत आदर्श कॉलनीतील एका अधिकाऱ्याच्या घरापुढे थांबलेल्या ट्रकमधील साहित्य काढून नेत पुन्हा कार्यालयात नेऊन ठेवले. कार्यकर्त्यांचा हा आक्रमक पवित्रा बघून खदान पोलिसांना कार्यालयात बोलावण्यात आले होते.

हेही वाचा - आरक्षण निघाले; उमेदवारच नाही! आता काय करणार?


जुने आरटीओ रोड येथे महाराष्ट्र पशूधन मंडळाचे कार्यालय आहे. या कार्यालयातून दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी वळू संगोपन, संशोधन व लसिकरणासाठी राज्य भरातील केंद्रांना निधी पुरविला जात होता. मात्र हे कार्यालय स्थलांतरीत करण्याचा डाव अनेक वर्षांपासून आखला जात होता.

हेही वाचा - महिलेनेच केले लैगिक शोषण, बलात्काराचा गुन्हा दाखल होताच युवकाने उचलले टोकाचे पाऊल

अखेर ५ फेब्रुवारी रोजी नागपूर येथील वळू संधोशन केंद्रात अकोल्यातील कार्यालय स्थलांतरीत करण्याचा आदेश धडला. या आदेशाची अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून एकात दिवसातच करण्यात आली. रविवारी सुटीची दिवस असल्याने याकडे कुणाचे लक्ष जाणार नाही असे समजून अधिकाऱ्यांना कार्यालयातील साहित्य ट्रकमध्ये भरून स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू केली होती.

हेही वाचा - कृत्रिम ऑक्सीजन प्लांट ऑक्सीजनवर

ही माहिती भाजप व प्रहारच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी कार्यालय गाठून साहित्य हलविण्यास विरोध केला.

भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात यांच्या नेतृत्वात नगरसेवक गिरीश जोशी, मनीराम टाले, माधव मानकर, देवाशीष काका, संतोष पांडे, गणेश अंधारे, मनोज शाहू, अजय शर्मा, विजय इंगळे, बाळ टाले, प्रशांत अवचार, आकाश ठाकरे, अभिजीत कडू, देवेंद्र तिवारी, डॉ. गौरव शर्मा, बन्सी चव्हाण, विकी ठाकूर, गणेश सपकाळ, राजे शिंदे, मनिष बाचोका, मनिष बुंदिले, मंगेश सांगा, रंजीत खेडकर, ओम कसले, विवेक देशमुख, संदीप गावंडे, आदींनी पशुसंवर्धन कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठाेकले. खदान पोलिसांनी आंदोलन कार्यकर्त्यांना अटक केली.

हेही वाचा - मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड केले अन बॅंक खात्यातून 35 हजार उडाले

या घटनेचा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी निषेध व्यक्त केला. रविवारी सुट्टी असताना हा प्रकार व तातडीने सामान हलवण्याची खरंच गरज होती का, असा सवाल सावरकर यांनी उपस्थित केला.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

(संपादन - विवेक मेतकर)
 

loading image